
लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- शहरातील धार रोडवरील सत्यम कापड केंद्र या दुकानाला काल रात्री १ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्यामुळे दुकानातील 30 ते 35 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे दुकानाचे मालक अनिल बन्सीलाल अग्रवाल यांनी सांगितले.
यामध्ये दुकानातील साहित्य कापड व इतर वस्तू जळून खाक झाले आहे. या वर्षांमधील कापड दुकानांमध्ये आग लागण्याची ही दुसरी घटना आहे.दरम्यान ही आग विझवण्यासाठी लोणार नगरपरिषद अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. याप्रकरणी अग्रवाल यांनी पोलिस ठाण्यांमध्ये दिलेल्या अर्जानुसार,विजेच्या शॉर्टसर्किटने न्यू सत्यम कापड केंद्र या दुकानाला आग लागली.
या दुकानात जवळपास 30 ते 35 लाख रुपयांचा कापडाचा माल, फर्निचर व इतर साहित्य होते.यातील सर्व फर्निचर, सुटिंग, शर्टिंग, साड्या, ड्रेस मटेरियल,अंडरगारमेंट तसेच उच्च दर्जाची कपडे व बिल बुक सारे काही जळून गेले. कोरोनाच्या काळानंतर मध्यंतरीच दुकान सुरू झाले. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन मध्ये या दुकानाचे आर्थिक नुकसान झाले होते. अशा परिस्थितीत आत्ता कुठे परिस्थिती पूर्वपदावर येत असतानाच,विजेच्या शॉर्टसर्किटने आग लागून झालेल्या नुकसानीमुळे अनिल अग्रवाल यांना मोठा धक्का दिला.
हे वाचलंत का?,
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.





