सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. इकडे त्यांची ही अवस्था आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार आहेत. आता या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते. पण हे किती दिवस चालणार?
मुंबई :- सध्या महाराष्ट्रात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे अश्यातच आज सभागृहात आल्यानंतर शिवसेनेतील एकही बंडखोर आमदार माझ्या डोळ्याला डोळा भिडवू शकत नव्हता, असे वक्तव्य आमदार आदित्य ठाकरे यांनी केले. मी किंवा माझ्यासोबत असलेल्या शिवसेना आमदारांच्या नजरेला नजर देण्याची हिंमत बंडखोर करत नव्हते. मग ते आपल्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांना कशाप्रकारे सामोरे जाणार आहेत, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. रविवारी आणि सोमवारी विधानसभेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. त्यापैकी आजच्या दिवशी नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. त्यानंतर सभागृहाचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले.
सभागृहातून बाहेर पडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी म्हटले की, बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नव्हता. इकडे त्यांची ही अवस्था आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यानंतर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार आहेत. आता या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते. पण हे किती दिवस चालणार? आज हे सर्वजण नैतिकतेच्या चाचणीत अपयशी ठरले आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
‘अनेकांना वाटलं होतं, एकनाथ शिंदेंला काय मिळणार?, पण…..’
तत्पूर्वी विधानसभा अध्यक्षांच्या निवडीनंतर अभिनंदन प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. माझ्यासोबत असलेल्या ५० आमदारांना फोडण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. आमच्या संपर्कात १०,१५,२० जण आहेत, असे सांगितले जात होते. तेव्हा मी बोललो की, कोण तुमच्या संपर्कात आहे, ते सांगा मी त्यांना विमानाने पाठवून देतो. एकाला तर मी स्वत: विमान देऊन परत पाठवले. त्यामुळे आमदारांवर कोणतीही जोर-जबरदस्ती झाली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ११५ आमदार असूनही त्यांनी ५० आमदार असलेल्या मुला मुख्यमंत्रीपद दिले. सगळ्यांना वाटलं होतं की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, एकनाथ शिंदेला काय मिळणार? परंतु भाजपने माझा सन्मान केला. यासाठी मी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि जे.पी. नड्डा यांचा आभारी असल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.
हे वाचलंत का ?
- Viral Video: एका १८ वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला; स्थानिकांच्या मदतीने वाचला जीव पहा अंगाच्या थरकाप होईल असा व्हिडिओ.
- बिबट्या पतीच्या नरडीचा घोट घेणार, तोच पत्नी आली रणरागिणी बनून बिबट्याशी एक तास झुंज देऊन पतीचे वाचविले प्राण, सर्वत्र कौतुक.
- संतापजनक;रक्षकच बनला भक्षक! महिलादिनानिमित्त सत्काराला बोलावून पोलिस कर्मचाऱ्यानेच केला महिलेवर बलात्कार, नागरिकांमध्ये संताप.
- एका व्यक्तीने त्याच्या दोन प्रेयसींसोबत मिळून तिसऱ्या प्रेयसीची केली हत्या; काय आहे प्रकरण व पोलिसांनी आरोपीच्या शोध कसा लावला, वाचा संपूर्ण बातमी.
- छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे अभिवादन; संभाजी महाराजांचे बलिदान म्हणजे राष्ट्रप्रेमाचा सर्वोच्च आदर्श – मंत्री गुलाबराव पाटील