पहाटे 2 वाजता नाकाबंदी दरम्यान कत्तलीसाठी जाणारी 11 गुरे पकडली ; चालकावर गुन्हा

Spread the love

जळगाव :- सध्या देशात गोहत्या करण्याचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच कत्तलीसाठी वाहनात कोंबून घेऊन जात असलेल्या ११ गुरांना शहर वाहतूक शाखेच्या पथकाने शनिवारी पहाटे २ वाजता नाकाबंदी दरम्यान पकडले आणि गुरांची सुटका केली. या प्रकरणी एम आयडीसी पाेलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

शहर वाहतूक शाखेचे वामन महाजन यांच्यासह हकीम शेख, हर्षद गवळी, समा तडवी, साहेबराव कोळी यांचे पथक शुक्रवारी रात्री नाकाबंदी करत होते. यावेळी खेडी परिसरातून एमएच-२०, इजी-१६९१ क्रमांकाचे वाहन त्यांनी तपासले.

यावेळी वाहनात ११ गुरे कोंबलेली दिसून आली. वाहनचालक शकील अहमद पिरजादे (रा. पिरजादेवाडा, मेहरूण) याच्याकडे गुरांच्या वाहतुकीचा परवानादेखील नव्हता. अखेर पोलिसांनी वाहन ताब्यात घेऊन सर्व गुरांची सुटका केली. महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पिरजादेविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

टीम झुंजार