राजीव खांडेकर यांची सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट .

Spread the love

झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
आटपाडी :- ( जि . सांगली )
आटपाडीचे सुपुत्र,एबीपी माझा मराठी वृत्तवाहिणी मुंबईचे संपादक राजीव खांडेकर यांनी आज आपले शालेय जीवनातील जिवलग मित्र सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून खाटीक परिवाराचा गौरव केला .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी आलेल्या राजीव खांडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी राजीव खांडेकर यांचा सादिक खाटीक आणि सौ .राबियाँबसरी सादिक खाटीक यांनी शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला .

यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत राजीव खांडेकर यांनी बराच वेळ गप्पागोष्टी केल्या खाटीक परिवारातल्या ज्येष्टांची विचारपुस केली . पुर्वीच्या अनेक बाबींबाबत सर्वांना बोलते केले . त्यावेळची आटपाडी, त्यावेळचे सामाजीक वातावरण, निष्पाप, निरागस, वृत्तीची माणसे आणि आताची आटपाडी यावर प्रकाशझोत टाकला . लहानांना आशीर्वाद दिले .

यावेळी अनिस खाटीक, श्रीमती रशिदा खाटीक, कुर्बानहुसेन खाटीक, सौ . फरहीन खाटीक, डॉ विनय पत्की, अरुण डोंबे, आझाद खाटीक, अमीर खाटीक, विधवा प्रथा बंदी आणि विधवांना सन्मान मिळवा यासाठी झगडणाऱ्या श्रीमती लतादेवी बाळकृष्ण बोराडे, दिलावर शेख, रियाज शेख, युवा नेते सचिनदादा पाटील, सोमा ढोबळे, रफीक तांबोळी, विशाल अर्जून अर्जुनवाडी (गोमेवाडी ), सचिन सुतार, झिशान कुर्बानहुसेन खाटीक ( पिलु ) इत्यादी उपस्थित होते .

आपण या बातम्या वाचल्या काय?

टीम झुंजार