झुंजार प्रतिनिधी – संतोष कदम.
आटपाडी :- ( जि . सांगली ) आटपाडीचे सुपुत्र,एबीपी माझा मराठी वृत्तवाहिणी मुंबईचे संपादक राजीव खांडेकर यांनी आज आपले शालेय जीवनातील जिवलग मित्र सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून खाटीक परिवाराचा गौरव केला .
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश महासचिव सादिक खाटीक यांच्या निवासस्थानी आलेल्या राजीव खांडेकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी राजीव खांडेकर यांचा सादिक खाटीक आणि सौ .राबियाँबसरी सादिक खाटीक यांनी शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार केला .
यावेळी जुन्या आठवणींना उजाळा देत राजीव खांडेकर यांनी बराच वेळ गप्पागोष्टी केल्या खाटीक परिवारातल्या ज्येष्टांची विचारपुस केली . पुर्वीच्या अनेक बाबींबाबत सर्वांना बोलते केले . त्यावेळची आटपाडी, त्यावेळचे सामाजीक वातावरण, निष्पाप, निरागस, वृत्तीची माणसे आणि आताची आटपाडी यावर प्रकाशझोत टाकला . लहानांना आशीर्वाद दिले .
यावेळी अनिस खाटीक, श्रीमती रशिदा खाटीक, कुर्बानहुसेन खाटीक, सौ . फरहीन खाटीक, डॉ विनय पत्की, अरुण डोंबे, आझाद खाटीक, अमीर खाटीक, विधवा प्रथा बंदी आणि विधवांना सन्मान मिळवा यासाठी झगडणाऱ्या श्रीमती लतादेवी बाळकृष्ण बोराडे, दिलावर शेख, रियाज शेख, युवा नेते सचिनदादा पाटील, सोमा ढोबळे, रफीक तांबोळी, विशाल अर्जून अर्जुनवाडी (गोमेवाडी ), सचिन सुतार, झिशान कुर्बानहुसेन खाटीक ( पिलु ) इत्यादी उपस्थित होते .
आपण या बातम्या वाचल्या काय?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






