पिंप्री येथे मंगळवारी गांगुमाता यात्रोत्सव. ग्रामप्रशासन सज्ज..!

Spread the love

पिंप्री खु ता धरणगाव

पिंप्री खु ही परिसरात असलेली मोठी बाजरापेठ आहे . गेल्या दोन वर्षे पासून महाराष्ट्र भरात कोरोना ने कहर केला होता त्या मुळे सर्वत्र सण ,सांस्कृतिक कार्यक्रम , मेळावे ,यात्रा , व तत्सम बाबतीत कोरोना नियम संबंधित अंमलबजावणी होत होती . परंतु या वर्षी बऱ्याच प्रमाणात कोरोना आजारावर मात मिळवण्यासाठी यश आले असून सर्वत्र निरबंध हटवण्यात आले आहेत.

पिंप्री येथे यात्रोत्सव

पिंप्री खु येथे साला बाद प्रमाणे गांगुमाता यात्रोत्सव असून गावातील सर्व समाज बांधव हे गंगू आई (गंगूमाता) ला आपल्या घरातील गोड धोड नैवेद्य मनोभावे अर्पण करतात . पिंप्री येथील यात्रोत्सव ला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे . येथील जुने जाणकार लोक आज ही ग्रामदैवत व घडलेल्या ऐतिहासिक घटना यावर प्रकाश टाकतात.

यंत्रणा तत्पर….

गावातील आरोग्य च्या दृष्टीने साफसफाई केली आहे . ठीक ठिकाणी काँक्रेटिकरण करणे सुरू आहे. येत्या काळात पिंप्री चा चेहरा मोहरा बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

यात्रा पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन यांना कळविले आहे. त्याच प्रमाणे सरपंच , उपसरपंच ग्रा सद्स्य , ग्रामसेवक ,पोलीस पाटील व गावातील जेष्ठ नागरिक , तरुण मित्र मंडळ यात्रोत्सव उल्हासदायक होण्यासाठी प्रयत्न करतात यात शंका नाही.

यात्रे दारम्यान लहान बालक व गर्दीच्या ठिकाणी स्वतः काळजीपूर्वक लक्ष घेण्याचे आवाहन ग्रामपंचायत पिंप्री यांच्याकडून करण्यात आले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार