निंबायती गावात रिचवल्या जातेय कोट्यावधी रु.ची अवैध दारु! राज्य उत्पादन शुल्क विभागाचे झोपेचे सोंग

Spread the love

सोयगाव,दि.२६..छोट्याशा लोकवस्तीचे गाव असलेल्या निंबायती गावात दररोज कोट्यावधी रु.ची देशी दारूची सर्रास विक्री होत असून हातभट्टी आणि गावरान दारूचे मोठ्या प्रमाणावर गाळप होत असल्याचा प्रकार मंगळवारी पहावयास मिळाला आहे.चार तांडे असलेल्या या गावाच्या एकट्या निंबायती गावातच तब्बल ११ ठिकाणी अवैध दारूची सर्रास विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आल आहे.तर इतर तीन तांड्यांची परिस्थिती वेगळीच आहे.

याकडे मात्र शासनाच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाने दुर्लक्ष केले असल्याने या भागात अवैध देशी,हातभट्टीचं दारूची विक्री आणि गाळप फोफावली आहे.हातमजुरी आणि शेती हा प्रमुख व्यवसाय असलेल्या निंबायती गावात चक्क अकरा ठिकाणी दारूची सर्रास विक्री होत आहे.गावरान आणि हातभट्टीच्या गाळप वेगळीच त्यामुळे एका दिवसात या गावात अवैध दारूच्या विक्रीपोटी तब्बल कोट्यावधी रु ची उलाढाल होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग गाढ झोपेत असून निंबायती गावाच्या या अवैध दारू विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी कोणताही विभाग पुढे येत नसल्याने विक्रीचा प्रकार वाढलेला आहे.

-ऐन श्रावण महिन्याच्या तोंडावर गोंधळ

निंबायती ता.सोयगाव या गावात अवैध देशी आणि हातभट्टीच्या दारूच्या विक्रीमुळे सायंकाळी या गावांच्या चौकात गोंधळ वाढला असून ऐन पवित्र श्रावण महिन्यात या गावांचे वातावरण गढूळ होत आहे.जिल्हा परिषदेची शाळा आणि माध्यमिक शाळा या दोघांच्या मुख्य रस्त्यावर या अवैध देशी आणि हातभट्टीच्या दारूची सर्रास विक्री होत असून या प्रमुख रस्त्यावरून महिलांनाही शेतात जाण्याची वाट आहे परंतु दारूच्या नशेत असलेल्या तळीरामांना घाबरून या महिलांना शेतावर कामासाठी जावे लागते,दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या गेल्या पाच वर्षाच्या अहवालात निंबायती गावात एकही दारू विक्री वरील रेड झालेली नसल्याचे निष्पन्न झाले असल्याने यावरून या विभागाची गाढ झोप लक्षात येते.

आर्थिक व्यवहारातून चालतोय सर्रास अवैध दारू विक्रीचा व्यवसाय-

निंबायती गावात आर्थिक संगनमतातून हि सर्रास विक्री सुरु असल्याचे महिलांनी सांगितले असून या मध्ये पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचे हात ओले झालेले असल्याचे या महिलांनी सांगितले.मागील आठवड्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी वाहन सोयगाव तालुक्यात आले होते परंतु हे वाहन निंबायती गावाजवळून गेल्यावरही या पथकातील अधिकार्यांना हा प्रकार कसा दिसला नाही आणि ग्रामीण पोलीसही गप्प का? असाही प्रश्न महिलांना पडलेला आहे.

-महिलांची मजुरी सायंकाळी पतीराज घालवितात दारूविक्री ठेल्यावर-

सध्या खुरपणी आणि निंदनीच्या कामांसाठी महिला पहाटेच घराबाहेर पडत आहे सायंकाळी थकून-भागून आलेल्या महिलांना मात्र तळीराम असलेल्या पतीराज यांचा पुन्हा धाक उभा राहतो आणि महिलांनी मिळविलेली दिवसभरची मिळकत सायंकाळी अवैध दारू विक्रीच्या ठेल्यावर जात आहे त्यामुळे महिलांवर्ग त्रस्त झाली आहे.

टीम झुंजार