लोणार स्टेट बँक येथे केवायसी साठी खातेधारकांना माराव्या लागतात चकरा….

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- लोणार येथील भारतीय स्टेट बँकेमध्ये शाखेमध्ये नागरिकांना केवायसी करण्यासाठी नागरिकांना विनाकारांणचा त्रास सहन करावा लागत आहे.नागरिक केवायसी साठी गेले असताना वारंवार चक्र मारावे लागत आहे यामुळे नागरिकांना आर्थिक तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत आहे, भारतीय स्टेट बँक शाखेला खेड्यापाड्यातील ग्राहकांची संख्या जास्त असून खेड्यापाड्यातील शेतकरी व मजूर वर्गाला बँकेच्या कामासाठी वारंवार लोणार ला येणे परवडणारे नाही कारण शेतकरी मजूर वर्गाला आपले काम धंदे सोडून दिवसभर बँकेत बसून सुद्धा ग्राहकांची कामे लवकर होत नाही. वारंवार ये-जा करण्यामुळे ग्राहकांचा पैसा व वेळ दोन्ही जात आहे.


यासारख्या बऱ्याच अडचणी खातेधाराकांना येत आहे या अडचणी दूर करण्यासाठी आज २६ जुलै रोजी सामाजिक कार्यकर्ते विनायकराव मापारी,अनंता शिंदे,दिपक नालेगावकर, शंकर गायकवाड,अंकुश काकडे,दत्ता चाटे सह ग्राहकांनी शाखा व्यवस्थापकांना निवेदन द्वारे खातेदारांना त्रास होणार नाही यासाठी अतिरिक्त काउंटर उघडून ग्राहकांची कामे वेळेवर कसे होतील याकडे लक्ष द्यावे यासाठी निवेदन दिले.

हे वाचलंय का ?

टीम झुंजार