नशिराबाद प्रतिनिधी ( सुनिल महाजन) येथील श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिरात वारकरी संप्रदाय चे आद्य प्रचारक श्री संत शिरोमणी सावता महाराज यांची संजीवन समाधी सोहळा आज मोठ्या हर्ष ऊत्साहत टाळ, मृद्गगाच्या, व वारकरी संप्रदाय च्या भक्तिभावात सकाळी ९ वाजता पार पडला.सर्वप्रथम श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या मुर्तीचा अभिषेक सपत्नीक कांचन व श्री किरण सुरेश माळी यांच्या हस्ते करण्यात आला.
श्री हभप रमेश पाटील यांच्या हस्ते पालखीचे पुजन करून दिंडी सोहळ्यास प्रारंभ करण्यात आला.
या सोहळ्यात संस्थेचे अध्यक्ष सुनिलशास्त्री महाराज, माजी सरपंच विकास भाऊ पाटील, माजी उपाध्यक्ष लालचंद पाटील, नशिराबाद शिक्षण मंडळ चे कार्याध्यक्ष योगेश पाटील, शिवसह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष गणेशभाऊ चव्हाण, माजी सरपंच पंकजभाऊ महाजन, शिवसेना शहर प्रमुख विकासभाऊ धनगर, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव माळी, संदीप रणधीर, श्री हभप रमेश पाटील सर, सुरेश माळी, सोपान महाजन, जगन पाटील, महेश माळी, दगा महाजन, सुधाकर महाजन, सजंय महाराज, तुळशीराम जगताप, सोपान शिवरामे, धनराज पाटिल, विठ्ठल माळी, मधुकर महाजन, प्रविण महाजन, अरूण पाटील, मोहन खारे, गणेश माळी व सुभाष माळी, सर्व भजनी मंडळ व महिला भजनी मंडळ उपस्थित होते.
सदर मिरवणुक संत शिरोमणी सावता महाराज मंदिरापासून फुले चौक – मेनरोड -नाईक वाडा या मार्गे पालखीवर पुष्प वृष्टी करून भव्य स्वागत गावातील भाविकांनी केले व महादेव मंदिराजवळ दिंडीची सांगता करण्यात आली.यानंतर काल्याचे भजन द्वारे व महाराजांच्या आरती ने कार्यक्रमाची सांगता करण्यात आला नंतर सर्वांनी महाप्रसादाचा स्वानंद घेतला.
या कार्यक्रमास सर्व मार्गदर्शन श्री हभप सुनिल शास्त्री महाराज यांचे लाभले त्यास सचिव पंढरीनाथ पाटील, अशोक पवार, संतोष पवार, हेमराज महाजन, भगवान पाटील, विकास पाटील, आबा पाटील, तेजस माळी, पत्रकार सुनिल महाजन, हर्षल महाजन, सचिन महाजन, संदीप जगताप, निलेश महाजन, रितेश महाजन, सुपडू चौधरी, वासुदेव महाजन, सुनिल महाजन व

कार्यक्रमासाठी सर्व भजनी मंडळी, स्वयंपाकी नामदेव गुरूजी माळी, प्रभाकर पवार, बाबूलाल महाजन, चंदू फेगडे सुधीर महाजन, काशिनाथ महाजन, संस्था पदाधिकारी, सदस्य,सर्व शाखा अध्यक्ष, युवक मंडळाचे कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीते साठी अथक परिश्रम घेतले.

आपण या बातम्या वाचल्यात का?
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.
- पिंपरखेड घटने प्रकरणी एक आरोपी अटक; भडगांव पोलिसात खुनाच्या गुन्ह्यासह ॲट्रोसिटी ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल
- एरंडोल येथे मॉर्निंग वॉक करुन परतणाऱ्या महसूल कर्मचाऱ्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू
- अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; भडगाव पोलिसात एका जणांविरुद्ध पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
- एरंडोलला युतीतर्फे भाजपचे डॉ.नरेंद्र ठाकूर यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर






