धक्कादायक,VIDEO: श्राद्ध करण्यासाठी गंगेत उतरले, एक-एक करून चौघे बुडाले.

Spread the love

श्राद्धासाठी गेलेल्या एका कुटुंबासोबत धक्कादायक घटना घडली आहे. गंगेत स्नान करत असताना कुटुंबातील चौघेजण बुडाले. वाचवण्यासाठी चौघेही आवाज देत होते. पण काही वेळाने आवाज येणं बंद झालं. पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना वाचवणं शक्य झालं नाही.

पाटणा ( Patna Bihar News ):- सध्या देशात सर्वत्र जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे नदी नाल्यांना पुर आले आहे अश्यातच पाटण्यात बुधवारी एकाच कुटुंबातील चार जणांचा गंगेत बुडून मृत्यू झाला आहे. पती-पत्नी आपल्या दोन मुलांसह श्राद्ध करण्यासाठी गेले असता ही दुर्देवी घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुडणाऱ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी ३-४ तरुणांनीही गंगेत उड्या घेतल्या. मात्र, प्रवाह इतका जोरदार होता की त्यांना वाचवता आलं नाही. हे कुटुंब मदतीसाठी ओरडत राहिलं पण नंतर अचानक त्यांचा आवाज बंद झाला.

ही कुटूंब पाटणाच्या शेखपूरा इथं राहणारं आहे. मुकेश कुमार (४८), आभा देवी (३२), सपना कुमारी (१५) आणि चंदन कुमार (१३) अशी मृतांची नावं आहेत. अधिक माहितीनुसार, आतापर्यंत या चौघांपैकी कोणाचाही मृतदेह हाती लागला नसून स्थानिक लोकांच्या मदतीने पोलीस नदीपात्रात शोध घेत आहेत.

बारह पोलीस स्टेशनचे प्रभारी राजनंदन यांनी सांगितले की, सध्या गंगा नदीत पाण्याचा प्रवाह जास्त आहे. त्यामुळे मृतदेह शोधणं कठीण झालं आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहावं, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार