पुणे : – सध्या महाराष्ट्रात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच पुण्यामध्ये मोबाईल चोरणाऱ्या भामट्यांचा सुळसुळात झाला असून, एकाच दुकानातून चोरट्यांनी तब्बल 1.53 कोटींचे 198 मोबाईल फोन चोरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आले आहे. चोरलेल्या या ऐवजांमध्ये आयफोन 11, 12 आणि 13 या मॉडेलचे 198 फोनसह 7 ipad, 3 लॅपटॉप यासह इतर सामग्रीचा समावेश होता. या प्रकरणी पोलिसांनी लोणीकंद पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
अब्दुल हाय अबुजार शेख, अभेदूर मुफजुल शेख, सुलतान अब्दुल शेख, अबूबकर अबुजार शेख, राबीवुल मुंटू शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे असून, वाघोलीमधील केसनंद रोड येथे असलेल्या सीमा वेरहाऊसमध्ये ही घटना 23 ते 25 जुलैदरम्यान घडली होती. त्यानंतर या प्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात वैभव झेंडे यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
चोरट्यांनी प्रो कनेक्ट सप्लाय चेन सोल्युशन या कंपनीच्या वेअर हाऊसमध्ये सिमेंटचे पत्रे फोडून आत प्रवेश करत अॅपल कपंनीचे मोबाईल लंपास केले. यामध्ये आयफोन 11, 12 आणि 13 या मॉडेलच्या वेगवेगळ्या रंगाचे 198 मोबाईल, 7 आयपॅडसह 3 लॅपटॉप यासह इतर सामग्रीचा समावेश होता. या सर्व गोष्टींची किंमत 1.53 कोटी इतकी असून पोलीस पुढील तपास करत आहेत
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






