दौंड पं. स. व जि.प. निवडणूक आरक्षण सोडत जाहीर; राजकीय पक्षआणि कार्यकर्त्यांमध्ये “कही खुशी कही गम”

Spread the love

दौंड प्रतिनिधी । (रवी देसाई)

दौंड : दौंड येथे पंचायत समितीचे निवडणूक आरक्षण सोडत लहान मुलींच्या हस्ते चिठ्ठी काढून काढण्यात आली आहे. यावेळी दौंडचे तहसिलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी संजय पाटील यांच्या उपस्थितीत सदरची सोडत नवीन प्रशासकीय इमारतीत पार पडली. यावेळी भुसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण साळुंखे, निवासी नायब तहसिलदार स्वाती नरुटे, दौंड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अजिंक्य येळे उपस्थित होते तर पुणे जिल्हा परिषद येथे जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

त्याचा लेखाजोखा खालीलप्रमाणे :
यामध्ये नव्याने जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीनुसार गणनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे :
सर्वसाधारण : राहू, खामगाव, लिंगाळी, पाटस, देऊळगावराजे.
सर्वसाधारण महिला राखीव : कानगाव, पिंपळगाव, कुरकुंभ, वरवंड, बोरीपार्धी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : खडकी, गोपाळवाडी.
नागरिकांचा मागास प्रवर्ग : यवत, राजेगाव.
अनुसूचित जाती महिला : पारगाव.
अनुसूचित जाती : बोरीभडक.

गटनिहाय आरक्षण खालीलप्रमाणे :
सर्वसाधारण : लिंगाळी-देऊळगावराजे, पाटस-कुरकुंभ, गोपाळवाडी-कानगाव, वरवंड-बोरीपार्धी, राहु-खामगाव
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला : यवत-बोरीभडक
अनुसूचित जाती महिला : खडकी-राजेगाव, पारगाव-पिंपळगाव.
तथापि, निवडणूक आरक्षण सोडत पार पडताच इच्छुक उमेदवारांनी आपल्या हालचाली सुरू केल्या असून विविध पक्ष आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. काहिंना मनासारखे आरक्षण मिळाल्याने त्यांच्यात व त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दौंड तालुक्याचे गटा-तटाचे राजकारण पाहता पुणे जिल्ह्यामध्ये दौंड तालुक्याची निवडणूक ही प्रतिष्ठेची समजली जाते. त्यामुळे कोण जिंकणार? कोण हारणार? आणि मतदार राजा कोणाला कौल देणार? हे येणारी निवडणूकच ठरवेल.

आपण या बातम्या वाचल्यात का?


टीम झुंजार