पहा VIDEO: जेसीबीतून फुलांचा वर्षाव, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या तीन दिवसीय दौऱ्याचे मालेगाव येथे जोरदार स्वागत.

Spread the love

डीजे बंद करा, माईकही नको, मध्यरात्री मुख्यमंत्र्यांचं मालेगाववासियांना खणखणीत आवाहन

मालेगाव :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या तीन दिवसीय महाराष्ट्र दौऱ्याला नाशिकमधून सुरुवात झाली. नाशिककडे जाताना पडघा, शहापूर आणि इगतपुरी येथे त्यांच्या स्वागताचे कार्यक्रम पार पडले. नाशिकमध्ये घोटी टोल नाक्यापासूनच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यानंतर शहरातील पाथर्डी फाटा येथे त्यांना भव्य हार घालून शहरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

यानंतर एकनाथ शिंदेंनी पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केले. मुंबई नाका येथे हजारो लोकांनी रात्री १२ वाजता त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.

व्हिडीओ पाहा :

शनिवारी (३० जुलै) मुख्यमंत्री मालेगाव आणि नाशिक या शहरांबाबत आढावा बैठक घेऊन या दौऱ्याला सुरुवात करणार आहेत.

टीम झुंजार