लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील वसंत नगर,देवा नगर,खापरखेड लाड,भुमराळा,दिपखेड,धायफळ,तांबोळा,हत्ता,चिखला, या परिसरात बऱ्याच दिवसापासून वन्य प्राण्याचा मुक्त संचार सुरू असल्याने शेतकऱ्याचे उभ्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग या वन्य प्राण्या पुढे हतबल झाला आहे.

लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे,रासायनिक खते खरेदी करून सोयाबीन, कपाशी, तुर, उडीद, मुंग खरिपातील इतर पिकाची पेरणी केली आहे काही शेतकऱ्यांनी पेरणी केल्यानंतर लगेच जोरदार पाऊस झाल्याने पेरलेले उगवले नसल्याने दुबार पेरणी करावी लागली आहे.सध्या पाऊस पिकाला उपयुक्त असल्याने शेतकऱ्याने नीदन , खुरपंन , डवरणेे ,कीटकनाशक फवारणी केल्याने पिके सुद्धा चांगली डोलत आहे परंतु दिवसेंदिवस रोह्याची संख्या झपाट्याने वाढत असून शेकडोच्या घरात गेली वन्य प्राणी रोही हे रात्रंनदिवस 30,40 च्या कळपा कळपाने उभ्या पिकातून मुक्त संचार करीत असल्याने पिके फस्त करून टाकतात तर त्यांच्या हैदोशामुळे कवळ्या पिकाचे अतोनात नुकसान होत असल्याने शेतकरी वर्ग मेटाकुटीस आला आहे. कधी कमी पाऊस तर कधी जास्त पाऊस अशा आसमानी सुलतानी संकटापुढे शेतकरी अगोदरच हतबल झाला आहे त्यामुळे शेतीला लागवडीला लागलेला खर्चसुद्धा वसूल होत नाहीी

. त्यातच वन्यप्राण्याचे पिकावर नवीनच संकट उभे राहिल्याने कहरच केला असल्याने शेतकरी त्रस्त आहेत पिकाच्या संरक्षणाकरिता शेताला तार कंपाऊंड आवश्यक आहे,परंतु महागडे तार आणावे कुठून असा प्रश्न निर्माण होतो.लोणार तालुक्यातील बऱ्याच गावाला लागून फॉरेस्ट शिवारातील कित्येक शेतकऱ्यांनी पावसाळा सुरू असून सुद्धा लेकरं बाळ घेऊन कुटुंब परिवार रोह्यापासून पिक वाचवण्या करीता शेतात झोपड्या बांधून मुक्कामी राहतात परंतु रात्री झोप लागल्यानंतर एक ते दोन च्या दरम्यान रोही येऊन पिके फस्त करीत असल्याने शेतकरी वैतागले आहे.
गतवर्षी सोयाबीनला बऱ्यापैकी भाव मिळाला असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीनचे पेरणी वाढ केली आहे परंतु वन्य प्राण्यांमुळे शेतकरी त्रस्त झाले असून याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी परिसरातील शेतकऱ्यांची एक मुखी मागणी असल्याची माहिती किनगाव जट्टू येथील सामाजिक कार्यकर्ता काशिनाथ राऊत यांनी दिली आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






