लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- तालुक्यातील चिखला या गावात सततच्या नापिकीला कंटाळलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे आज ८ ऑगस्ट रोजी ही घटना घडली आहे.
संपत नागरे (वय४०,रा.चिखला काकड ) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.विठ्ठल नागरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.सततच्या नापिकीला ते कंटाळले होते.त्यामुळे आज घरातले इतर लोक शेतात गेलेले असताना त्यांनी गळफास घेतला.घटनेची माहिती मिळताच बिबी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ दिनेश चव्हाण,पोकॉ रोहिदास पांढरे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






