भीषण अपघात : धरणगाव नजीक भीषण अपघातात दोन युवक ठार

Spread the love

धरणगाव :- सध्या महाराष्ट्रात अपघातच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच चोपडा रोडवरील पिंपळे गावाजवळ भीषण अपघातात दोन तरूण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत धरणगाव पोलीस ठाण्यात नोंद घेण्याचे काम सुरू होते.

या संदर्भात अधिक असे की, शहरातील संजय नगर भागातील रहिवाशी असलेले प्रदीप पाटील (वय-२३) आणि किशोर पाटील (वय-३१) हे दोघं आज कामानिमित्त चोपडा येथे गेलेले होते. दुपारी चोपड्याहून परत येतांना पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीचा (एमएच १९ सीएच ३८९४) अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की, एकाची कवटीच फुटली तर दुसऱ्याच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. रस्ते अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे धरणगावात हळहळ व्यक्त होत आहे.

नेमकी काय आहे घटना?

धरणगाव शहरातील संजय नगर भागातील रहिवाशी असलेले प्रदीप पाटील व किशोर पाटील हे दोघं आज कामानिमित्त चोपडा येथे गेलेले होते. दुपारी चोपड्याहून परत येतांना पिंपळे गावाच्या फाट्याजवळ असलेल्या नायरा पेट्रोल पंपाच्या वळणावर त्यांच्या दुचाकीचा (एमएच १९ सीएच ३८९४) अपघात झाला.

हा अपघात इतका भीषण होता की, एकाची कवटीच फुटली तर दुसऱ्याच्या पायाचे तीन तुकडे झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण शहरातील राजकीय, सामाजिक क्षेत्रात काम करणारे मंडळी ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले होते. रस्ते अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे धरणगावात हळहळ व्यक्त होत आहे

हे वाचलंत का ?

टीम झुंजार