चंदीगढ : – सध्या देशात हिराॅईन तस्करीचे प्रमाण वाढतच चालली आहे अश्यातच आज सकाळी पंजाबमधील पोलिसांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये पंजाबच्या फिरोजपूर येथे पोलिस आरोपींच्या एका कारचा फिल्मी स्टाईल पाठलाग करताना दिसत आहेत. पांढऱ्या रंगाच्या एका स्विफ्ट डिझायर कारचा पाठलाग पोलिस करत असून पोलिसांनी या गाडीवर गोळीबारही केला आहे. या सगळ्या झटापटीनंतर पोलिसांनी दोघांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्सची तस्करी करणाऱ्या आरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. रस्त्यावर नाकाबंदी सुरू असताना आरोपीला संशय आल्यावरून त्यांनी तेथून पळ काढला पण पोलिसांनी त्यांचा फिल्मी स्टाईल पाठलाग केला. बराच पाठलाग करूनही पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश न आल्याने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. अखेरीस आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं असून त्यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून १० ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर अधिकचा तपास सुरू असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






