एंरडोल :- खान्देशचे ग्रामदैवत असलेल्या कानबाई मातेची सोमवारी भर पावसात वाजतगाजत मिरवणूक काढून फुगड्या खेळत पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीद्वारे उत्साहात विसर्जन करण्यात आले. या मिरवणुकीदरम्यान महिलांनी घातलेल्या फुगड्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. यात अनेक ठिकाणी महिलांनी पारंपरिक पेहराव केला होता. नऊवारी साडी व डोक्यावर फेटा अशी पारंपरिक वेशभूषेत साेमवारी सकाळी नऊ वाजेपासूनच कानबाई मातेच्या विसर्जनाला सुरुवात झाली.

कानबाई मातेला सकाळी दहीभाताचा नैवेद्य अर्पण करून तसेच विधिवत पूजन करीत पारंपरिक पण साध्या पद्धतीने अंजनी नदीच्या काठावर, महादेव मंदिराजवळ व गांधीपुरा भागात नदी काठावर कानबाईचे विसर्जन करण्यात आले. कानबाईच्या विसर्जन मिरवणुकीला काळाच्या ओघात आधुनिक रूप आले आहे. यात विसर्जन मार्गात अनेक ठिकाणी पारंपरिक वाद्य, बँडच्या तालावर महिलांनी फुगड्या खेळल्या. कलश व कानबाईची आरास डोक्यावर घेत अनेक महिला व पुरुष कानबाईचे विसर्जनात पुढाकार घेतात. शहरातील अंजनी नदीच्या काठावर तसेच महादेव मंदिराजवळ व गांधी पुरा भागातील नदींच्या काठावर मातेचे विसर्जन भक्तिभावात करण्यात आले.
पहा व्हिडिओ :
पाऊस व कानबाई रोट असा याेग
खान्देशचे ग्रामदैवत असलेल्या कानबाई मातेची भर पावसात वाजतगाजत काढण्यात आलेली मिरवणूक.
कानबाई मातेचे विसर्जन करण्यासाठी अंजनी नदीत कानबाई भक्तांमध्ये उत्साह आहे. सोमवारी झालेला पाऊस व कानबाई रोट असा दुहेरी योग जुळून आला. त्यामुळे भक्तांनी कानबाई मातेला भक्तिभावाने निरोप दिला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






