चोपडा :- सध्या महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच चोपडा तालुक्यात पुन्हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झोपडीत राहणाऱ्या महिलेवर एकाने मद्याच्या नशेत अत्याचार केल्याने ती महिला गर्भवती झाली, या अत्याचारातून तिने बाळाला जन्म दिला, धक्कादायक म्हणजे, बाळाच्या जन्मानंतर घाबरलेल्या पिडितेने ते बाळ नाल्यात फेकले. दरम्यान, नवजात बालकाला तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून पिडीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमाविरुद्ध चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोपडा तालुक्यातील सनपुले येथे वास्तव्यास असलेल्या महिलेवर संशयित आरोपी कैलास गोकुळ पाटील याने नऊ महिन्यापुर्वी मद्याच्या नशेत सदर महिलेवर अत्याचार केले. या अत्याचारातून तिला दिवस गेले. यातून तिने बाळाला जन्म दिल्याने समाजात बदनामी होवू नये म्हणून घाबरुन तिने आपल्या पोटच्या बाळाला नाल्यात फेकून दिले. दरम्यान, चोपडा ग्रामीण पोलीसांनी घटनेची माहिती मिळताच पोलीस सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषीकेश रावले, पोलीस निरीक्षक देविदास कुनगर, पोलीस उपनिरीक्षक अमरसिंग वसावे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
दरम्यान, नवजात बालकाला तातडीने चोपडा ग्रामीण रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पिडीत महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधम कैलास गोकुळ पाटील याला मंगळवारी ९ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा अटक करण्यात आली आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक कृषिकेश हे करीत आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






