आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे त्याची भरभराट व्हावी यासाठी बहिणी देवाकडे प्रार्थना करतात आणि असं म्हणतात की या पवित्र दिवशी देव सुद्धा बहिणीचं ऐकतो.
आज ११ ऑगस्ट रोजी संपूर्ण देशात रक्षाबंधन साजरा करण्यात येणार आहे. आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभावे त्याची भरभराट व्हावी यासाठी बहिणी देवाकडे प्रार्थना करतात आणि असं म्हणतात की या पवित्र दिवशी देव सुद्धा बहिणीचं ऐकतो. हे जर खरे असेल तर शुभ मुहूर्तावर आपण भावाला राखी बांधल्यास हे नक्कीच फायद्याचे ठरू शकते. ज्योतिष अभ्यासकांच्या माहितीनुसार, रक्षाबंधनसाठी ११ ऑगस्टला सकाळी १० वाजून २८ मिनिटांनी शुभ मुहूर्त सुरू होऊन १२ ऑगस्टला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपर्यंत राहील. मात्र या दरम्यान जवळपास एक- दीड तास राहू काळ असणार आहे.
पंचांगानुसार ११ ऑगस्टला दुपारी २ वाजून ८ मिनिटांनी राहू काळ सुरु होऊन दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांपर्यंत चालू राहील. शक्य झाल्यास या वेळेत भावाला राखी बांधणे टाळावे. तर सकाळी ९ वाजून १८ मिनिट ते १० वाजून ५५ मिनिटांपर्यंत सुद्धा कुलिक काळ सुरु असणार आहे. दुपारी ३ वाजून ३२ मिनिटे ते संध्याकाळी ४ वाजून २३ मिनिटांच्या दरम्यान दुमुहूर्त असल्याने ही वेळ सुद्धा रक्षाबंधनासाठी अशुभ आहे.
रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता ?
रक्षाबंधनासाठी अभिजीत मुहूर्त म्हणजेच दुपारी १२ वाजून ६ मिनिटांपासून ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत सुरु राहणार काळ हा अत्यंत शुभ असेल तर संध्याकाळी सुद्धा ६ वाजून ५५ मिनिटांपासून ते ८ वाजून २० मिनिटांपर्यंत राखी बांधण्यासाठी अमृत योग आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी एकमेकांपासून दूर राहणारे भाऊ बहीण सुद्धा आवर्जून भेटून सण एकत्र आनंदाने साजरा करतात. यावेळी कधी घरी जाण्याची घाई किंवा कामाची गडबड असेल तर वेळ न पाहता सोयीने राखी बांधली जाते. अशावेळी शुभ मुहूर्ताचे पालन करता आले नाही तर निदान अशुभ काळात राखी बांधणे टाळावे असा सल्ला दिला जातो.
(टीप- येथे देण्यात आलेली माहिती गृहितके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.)
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






