आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा यांचा हर घर तिरंगा जागृती रॅली मध्ये उस्फुर्त सहभाग.

Spread the love

धरणगाव ( पिंप्री ) :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने भारत भर विविध उपक्रम राबविले जात असून जनसामान्य लोकांपर्यंत जागृती केली जात आहे . याचाच एक भाग म्हणून शालेय उपक्रमात , चित्रकला स्पर्धा , रांगोळी स्पर्धा ,वक्तृत्व ,सैनिक बांधवांचा सत्कार ,आदी उत्साहात सुरू आहेत


दि 11 ऑगस्ट 2022 रोजी पिंप्री खु ता धरणगाव येथे गावातून तिरंगा रॅली चे आयोजन करण्यात आले होते. ज्यात आदर्श प्राथमिक व माध्यमिक शाळा पिंप्री यांचा उस्फुर्त सहभाग होता . या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सॊ व्ही एम चौधरी , उपशिक्षक आर आर पावरा , एस के शिंदे ,आर एस पाटील ,शरीफ पटेल , सचिन पवार , जितेंद्र पाटील , सॊ मनीषा पाटील ,तर माध्यमिक विभागाचे विजय साळवे , सॊ भावना भट , दीपिका पाटील , शिक्षकेतर कर्मचारी सौरभ देसले ,सुदर्शन चव्हाण , अविनाश पाटील आदी उपस्थित होते. देशाविषयी अभिमान व घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता

हे वाचलंत का ?

टीम झुंजार