लोणार/उध्दव आटोळे
लोणार :- परीसराचा व सरोवराचा विकास व्हावा या साठी सतत आपली लेखणी आणि वाणी झिझवणारा अवालिया चळवळीत काम करणारा माणूस नेहमी वळवळ करत असतो त्याचं चळवळीतुन खऱ्या अर्थाने अन्यायाविरुद्ध लढण्याची शक्ती खऱ्या अर्थाने मिळते अन्याय विरुध्द बंड करण्याच्या भुमीकेतुन खऱ्या अर्थाने कविचा जन्म होतो.बुलढाणा जिल्यातील आणि महाराष्ट्राच्या साहित्यिक प्रांतातील एक नवोदित आणि क्रांतिकारक कवि,चित्रकार म्हणून ज्यांची’माझ्या ह्यातीचा दाखला’या एकाच काव्यसंग्रहाणे संपूर्ण महाराष्ट्राला ज्यांची ओळख झाली.या कविता संग्रहातील अनेक कविताया व्यवस्थेविरुद्ध बंड करुन उठते त्यात आबालवृद्ध,शेतकरी,कार्यकर्ता,नेता,राजकारण अशा विविध क्षेत्रातील घडामोडींचा मागावा खऱ्या अर्थाने कविवर्य डॉ विशाल इंगोले यांनी या कविता संग्रहाच्या माध्यमातून घेतलेला विषय हा अत्यंत संवेदनशील आहे.
या कवितेतला प्रत्येक शब्द खऱ्या अर्थाने काळजाला भिडतो त्यांची कविता सर्वसामान्यांच्या दु:खाची अभिव्यक्ती त्यांच्या कवितेतून होते.सर्वसामान्य माणसाला त्यांची कविता आपली वाटते “अन्यायाविरुद्ध”चिडून उठण्याची प्रेरणा देते अशा या क्रांतिकारक विचाराची आपल्या लेखणीच्या माध्यमातून लिखाण करणाऱ्या कविच्या”अतिक्रमण”कवितेची दखल संत गाडगेबाबा अमरावती विध्यापीठाने घेतली व ही कविता बी.ए.प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आली.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






