जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांने इंग्रजी साक्षरता अभियानात महाराष्ट्रातून दुसरा क्रमांक

Spread the love

लोणार/उध्दव आटोळे

लोणार :- तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा उदनापूर या शाळेचा इयत्ता दुसरीचा विद्यार्थी सार्थक निलेश जाधव यांने Leap For Word या संस्थेद्वारे आयोजित English Literacy Program च्या समर कॅम्प 2022 या स्पर्धेत महाराष्ट्रातून दुसरी रँक मिळवत बाजी मारली आहे.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील ४००० होऊन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून सार्थक निलेश जाधवने इयत्ता दुसरी मधून महाराष्ट्रातून द्वितीय क्रमांक मिळवला. सार्थक च्या या यशाबद्दल उदनापूर शाळेचे मुख्याध्यापक विजय ठाकूर, सहाय्यक शिक्षक गजानन धोटे,निलेश जाधव तसेच शाळा स्थापन समिती अध्यक्ष विनोद रामचंद्र मुळे यांनी त्याचे स्वागत केले.

एका ग्रामीण भागातील मराठी शाळेतील विद्यार्थ्यांने इंग्रजी स्पर्धेत असामान्य यश मिळवले त्याबद्दल सर्वत्र सार्थकचे कौतुक होत आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार