Crime News : अमळनेर तालुक्यातील एका गावात मोठ्या दिराने सख्ख्या लहान भावाच्या विधवा पत्नीवर मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासू, सासरे, दीर आणि जाऊविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मोठ्या दिराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या अत्याचारातून पीडिता गरोदर राहिली असून तिच्या तक्रारीनुसार बुधवारी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
हायलाइट्स:
- दिराचा सख्ख्या भावाच्या विधवेवर अत्याचार
- मुलाला मारुन टाकण्याची धमकी दिली
- अत्याचारातून पीडिता गरोदर
अमळनेर :- सध्या महाराष्ट्रात महिला लैंगिक अत्याचाराची घटना काही केल्या कमी होत नाहीये अश्यातच दीर आणि भावयजीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अमळनेर तालुक्यातील एका गावात मोठ्या दिराने सख्ख्या लहान भावाच्या विधवा पत्नीवर मुलाला जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सासू, सासरे, दीर आणि जाऊविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मोठ्या दिराला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या अत्याचारातून पीडिता गरोदर राहिली असून तिच्या तक्रारीनुसार बुधवारी मारवड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पीडितेला आधार नसल्याने तिला जळगावा शासकीय आशादीप वसतीगृहात दाखल करण्यात आले आहे.
या संदर्भात पीडित महिलेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, साधारण सहा-सात महिन्यांपूर्वी ती सासरी असतांना मोठ्या दिराने पीडितेला मुलाला मारुन टाकेल अशी धमकी देत इच्छेविरुध्द पीडितेसोबत शारिरीक संबध प्रस्थापित केले. यामुळे त्याच्यापासून पीडिता गरोदर राहिली. त्यानंतर एवढेच नाहीतर सासू, सासरे जाऊ यांनी पीडितेच्या पोटावर हाता-बुक्यांनी मारहाण केली. तसेच, शिवीगाळ करत तिचा छळ केला.
याप्रकरणी पीडितेने धुळे शहर पोलिसात तक्रार दिली होती. शून्य क्रमांकने तो गुन्हा बुधवारी पीडितेचा मोठा दीर, जाऊ, सासू आणि सासरे या चार जणांविरोधात मारवड पोलिसांत दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील हे करीत आहेत.
दरम्यान, पीडितेला आधार नसल्यामुळे तिला जळगावच्या आशादीप महिला संरक्षण केंद्रात ठेवण्यात आले. तर संशयित दीर गोपाल भोई याला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






