झुंजार । प्रतिनिधी एरंडोल :- येथील य. च. शि. प्र. मंडळाचे दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, क्रीडा विभाग , विद्यार्थी विकास विभाग तसेच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हर घर तिरंगा अंतर्गत माजी सेना सैनिक यांचा स्वागत सत्कार समारंभ संपन्न झाला.या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष मा. दादासाहेब अमित राजेंद्र पाटील हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते, तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य मा. प्रा.एन. ए. पाटील उपस्थित होते .
कार्यक्रमाची सुरुवात ईशस्तवन व स्वागत गीताने करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित असलेले सेवानिवृत्त सेना सैनिक यांचा स्वागत सत्कार समारंभ आरंभ झाला त्यामध्ये एरंडोल येथील खानदेशी रक्षक संघटनेचे अध्यक्ष मा. गणेश शिंदे, उपाध्यक्ष मा. अनिल पाटील, ज्येष्ठ सदस्य मा. राजेंद्र पवार तसेच संघटनेतील सदस्य मा. गणेश मराठे, मा. गणेश सोनार, मा. रघुनाथ सुतार, मा. गोविंद बागुल, मा. दिलीप बडगुजर, मा. अनिल महाजन, मा. समाधान पाटील, मा. विजय महाजन, मा. कृष्णा महाजन, मा. मनोज पाटील, मा. वीरभार पाटील, मा. सुरेश धनगर , मा. सागर महाजन, माननीय मुसा भाई व प्रसन्नजीत साहेब इत्यादी सेवानिवृत्त सेना सैनिक यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष माननीय दादासाहेब अमित पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एन. ए. पाटील व उपप्राचार्य डॉ. ए. ए. बडगुजर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.एन. ए. पाटील यांनी आपल्या मनोगतामध्ये स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत असताना महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष कै. दादासाहेब दिगंबर शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्ष असून त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजनाची रूपरेषा सांगितली तसेच देशाचा जवान कशा पद्धतीने आपल्या जीवाची परवा न करता व कुटुंबाची पर्वा न करता देशाचे रक्षण करतो याबद्दल विद्यार्थ्यांना प्रेरित केले.
खानदेशी रक्षण संघटनेचे अध्यक्ष माननीय गणेश शिंदे तसेच उपाध्यक्ष माननीय अनिल पाटील व सदस्य माननीय गणेश मराठे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना आवाहन केले की, “त्यांनी जास्तीत जास्त संख्येने भारतीय सेनेमध्ये यावे व देशाची सेवा करावी.अध्यक्षीय भाषणामध्ये माननीय दादासाहेब अमित पाटील यांनी सेवानिवृत्त सेना सैनिक यांना आश्वासन दिले की,

महाविद्यालयातील विद्यार्थी व विद्यार्थिनी सेनेमध्ये सहभाग नोंदवतील अशी आशा व्यक्त केली व सेवानिवृत्त सेना सैनिक यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
उपस्थितांमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. अरविंद बडगुजर, प्रा. ए .टी . चिमकर, प्रा . नरेंद्र तायडे ,प्रा. डॉ. नितीन दांडेकर, प्रा. डॉ. रामा वानखेडे, प्रा .डॉ. संदीप कोतकर , प्रा. डॉ. सचिन पाटील प्रा. डॉ. बालाजी पवार, प्रा. डॉ. हेमंत पाटील, प्रा. विजय गाढे, प्रा. योगेश यंडाईत, प्रा. सागर विसपुते, प्रा. सुरज वसावे , प्रा .अतुल पाटील,प्रा. शर्मिला गाडगे, प्रा. रेखा साळुंखे, प्रा. सविता पाटील ,प्रा. राहुल पाटील, प्रा. सजगणे , प्रा. महेंद्रसिंग शिरसाट प्राध्यापक सागर पाटील प्राध्यापक उमेश सूर्यवंशी इत्यादी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयातील क्रीडा प्रमुख प्रा. के. जे. वाघ व राज्यशास्त्र विभागातील प्रा. डॉ . मीना काळे यांनी केले यावेळी स्वागत गीत व देशभक्तीपर गीत महाविद्यालयातील विद्यार्थिनी स्नेहल कैलास झाल्टे ,अश्विनी अरुण पाटील ,गायत्री भगवान जाधव, अश्विनी विजय पाटील यांनी गायले .व आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार वनस्पती विभागातील विभाग प्रमुख डॉ. एस. एम. साळुंखे यांनी मानले.

आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






