लासुर्णे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने 550 राष्ट्रध्वजाचे मोफत वाटप..

Spread the love

प्रतिनिधी – संतोष कदम.


लासुर्णे :- ( ता. इंदापूर ) लासुर्णे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीने स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झंडा”या उपक्रमा संदर्भात जनजागृती करण्यात आली. तसेच युवा प्रतिष्ठानच्या वतीने मोफत 550 राष्ट्रध्वजाचे वाटप करण्यात आले

.व राष्ट्रध्वज उभारण्यासाठी नियम नियमावली याचे पालन करणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहोत त्यानिमित्ताने प्रत्येक देशाच्या नागरीकाला देशाभिमान, देश प्रेम, तसेच समता, स्वातंत्र्यता, आणि बंधूता चे विचार आज खऱ्या अर्थाने रुजने महत्वाचे आहे. युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्यक्रम‌ आयोजित करण्यात येत असतात. कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सहकार्य करत आले आहे.


यावेळी इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चा संघटक ॲड . मंगेश प्रभाकर लोंढे अध्यक्ष डॉ .बाबासाहेब आंबेडकर युवा प्रतिष्ठान व युवा वर्ग महावीर भोसले, किरण मिसाळ, हृदयनाथ लोंढे, सोमनाथ भोसले, शुभम सुर्वे, सचिन यादव, अमोल खोमणे, अहमद कुरेशी, सद्दाम कुरेशी उपस्थित होते.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार