विखरण येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत शेतकरी सेंद्रिय शेती प्रशिक्षणाच्या कार्यक्रम संपन्न

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी (हिम्मतराव महाजन)
विखरण :-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रम अंतर्गत विखरण ता एरंडोल येथे शेतकरी सेंद्रिय शेती प्रशिक्षणाच्या कार्यक्रम संपन्न झाला सर्वप्रथम राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन ग्रामपंचायत सदस्य गुलाब महाजन यांचे शुभहस्ते करण्यात आले.


सेंद्रीय शेती बाबत कूषी सहाय्यक श्री कुंदन पाटील यांनी मार्गदर्शन करुन सेंद्रिय शेतीचे फायदे तोटे विशद करून सांगितले विष मुक्त शेती यावर कूषी अधीकारी पंचायत समिती एरंडोलचे श्री बी एस मोरे व आर के पटाईत, पी एल मोरे, सी बी सोनवणे ग्राम विकास आधीकारी ग्रा पं विखरण यांनी सखोलपणे मार्गदर्शन केले पतंजली बायो रिसर्च पवन इंगळे गोदावरी व बायो फर्टिलायझर इंडस्ट्रीजचे. योगेश पाटील, रोहीत खैरनार ‌यानी शेतकरीच्या प्रश्न समजून घेऊन त्यावर मार्गदर्शन करुन फायदे तोटेची जानीव करून दिली

अनेक प्रश्न समजून घेऊन दिलखुलास पुणे मार्गदर्शन केले. विखरण येथील अनेक शेतकरी यांनी सेंद्रिय शेती प्रशिक्षणाच्या लाभ घेतला यावेळी रघुनाथ महाजन, गरबड महाजन, शिंदे नानाभाऊ पाटील ,शांताराम मिस्त्री, हिंमतराव महाजन इत्यादी उपस्थित होते आभार कुंदन पाटील यांनी मानले

टीम झुंजार