माझ्या शाळेने दिलेला हा सन्मान आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. तरुण तरुणींनी देश सेवेत आपले योगदान तर द्यावेच त्यासोबत समाजसेवा ही करावी श्री. नवनीत पाटील(मा.सैनिक)
धरणगाव येथील शतकोत्तर पी.आर.हायस्कूल मध्ये आज भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त माजी सैनिक तथा पी.आर.हायस्कूलचे १९६८ च्या बॅचचे माजी विद्यार्थी श्री.नवनीत पुंडलिक पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. श्री.नवनीत पाटील हे भारतीय तोफखान्यात १९६९ ला एरंडोल येथे भरती झाले त्यानंतर त्यांनी हैदराबादला सैनिकी प्रशिक्षण घेतले घेऊन १९७१ च्या भीषण भारत- पाक युद्धात व सुवर्णमंदिर युद्धात सुद्धा सहभाग होता.
याशिवाय भारत – बांगलादेश युद्धात सराव शांती सेनेत ते सहभागी होते सदरहू १८ वर्षे देशसेवेसाठी देऊन ते सेवानिवृत्त झाले. या प्रसंगी ध्वजारोहण सोहळ्यात मुख्याध्यापक तथा प्रसिद्ध कवी डॉ. संजीवकुमार सोनवणे,उपमुख्याध्यापक डॉ.सौ.आशा शिरसाठ, ज्येष्ठ शिक्षक श्री.बी.डी.शिरसाठ, श्री.यू.एस.बोरसे,
एनसीसी मेजर श्री.डी.एस.पाटील यांच्या सह शाळेचे शिक्षक बंधू भगिनींनी शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. एनसीसी मेजर श्री.डी.एस.पाटील यांनी परिचय करून दिला. क्रीडा शिक्षक श्री.वाय.ए.पाटील, श्री.एम.डी.परदेशी यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
आपण या बातम्या वाचल्यात का?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






