प्रगतशील शेतकरी श्री.मल्हार कुंभार यांचा अभिनव उपक्रम.
मौजे: चोरवड येथील प्रक्षेत्रात नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत बांधावर बांबू व साग लागवडीचा शुभारंभ.
पारोळा :- चोरवड येथील शेतकरी श्री. मल्हार प्रल्हाद कुंभार यांनी स्वातंत्र्य दिवसाच्या निमित्त व स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतेवेळी त्यांनी आपल्या क्षेत्रात गावातील सैनिक श्री.पुंजूदादा साळवे, प्रशांत दादा जोशी यांच्या शुभ हस्ते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) योजनेअंतर्गत मंजूर असलेले बांधावर बांबू (१६०० झाड) व सागाच्या (४०० झाड) झाडांची लागवड करून सैनिकांचा सन्मान घडवून एक आदर्श गावात निर्माण करून दिला.

या वृक्षारोपण कार्यक्रमास चोरवड गावाचे सरपंच राकेश दादा पाटील, भोंडण गावाची सरपंच भैया दादा पाटील,डॉ. प्रशांत पाटील, जितेंद्र पाटील, राहुल सर, राकेश पाटील, चंद्रकांत पाटील,विलास देसले व शेतकरी बांधव उपस्थित होते.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






