प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडिअम स्कूल , आदर्श बालक ,प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा

Spread the love

धरणगाव ( पिंप्री ) :- ७५ व्या अमृत महोत्सव निमित्ताने समग्र भारतात हर्षोउल्हास चे वातावरण आहे . तसेच शालेय स्तरावर विविध स्पर्धा , प्रकल्प , आरोग्य शिबीर , सामाजिक ,देशाभिमान असणारे उपक्रम राबविण्यात येऊन स्वातंत्र्याचा गोडवा गायीला गेला.

पिंप्री खु येथील प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मेडिअम स्कूल , आदर्श बालक ,प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात स्वातंत्र्य दिवस उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम विद्यार्थ्यांना विविध महापुरुषांचे वेष परिधान करण्यात आले त्या नंतर प्रभात फेरीत घोषणानी आपली कृतज्ञाता व्यक्त केली . ध्वजारोहण श्री एकनाथ देवराम चौधरी सेवानिवृत्त मुख्याध्यापक यांच्या हस्ते संपन्न झाले . या वेळी आदर्श माध्यमिक बॅच च्या 100 % निकाल लागलेल्या बॅच चा सत्कार करण्यात आला प्रसंगी महेश्वरी बडगुजर (प्रथम) , विवेक बडगुजर (द्वितीय) , असमा शेख (तृतीय ) व सर्व यशस्वीना बक्षीस देण्यात आले.


तसेच नवनियुक्त केंद्रप्रमुख श्री प्रमोद पाटील सर ,तसेच ऍड गजानन पाटील सर (सचिव – वकील संघटना धरणगाव) यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. या वेळी दिलीप तायडे सर (सेवानिवृत्त सहायक फौजदार जळगाव ) , प्रा सुरज वाघरे , पापा वाघरे , कमलाकर मोहिते- संपादक महाराष्ट्र न्युज 21 , आदी उपस्थित होतेे

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवात संस्थेचे अध्यक्ष आणासो मधुकर रामजी चौधरी , उपाध्यक्ष प्रमोद चौधरी , सचिव विनोद चौधरी सर आदी उपस्थित होते . तत्पूर्वी विद्यार्थ्यांनी मनोगत ,देशभक्ती गीत नृत्य , मानवी मनोरे , लेझीम पथक , आदी माध्यमातून मनमोहक कलाकृती सादर केल्या .

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चारही युनिट चे मुख्याध्यापक , शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतल्या बद्दल संस्थेच्या संचालिका यशोदा चौधरी यांनी कौतुक व्यक्त केले

सूत्रसंचालन एस के शिंदे यांनी केले तर आभार आर एस पाटील यांनी मानले

हेही वाचा :

टीम झुंजार