प्रतिनिधी : संतोष कदम.
जंक्शन :- ( ता. इंदापूर ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जंक्शन या ठिकाणी 75 वा अमृत महोत्सव स्वातंत्र्य दिन स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी ठीक सात वाजता जंक्शन गावांमधून विद्यार्थी, विद्यार्थिनी यांची प्रभात फेरी काढण्यात आली. जय जवान जय किसान भारत माता की जय , वंदे मातरम् च्या घोषणेने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता .

यानंतर सकाळी ठीक आठ वाजता शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष विजयराव बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले .

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती जंक्शन गावचे प्रशासक किरण मोरे साहेब तसेच ग्रामसेविका सौ दिपाली संजय लडकत या होत्या .
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे संतोष कांबळे सचिव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य भाजपा, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रदीप रमेश भोसले, यशवंत गोफणे , मुख्याध्यापक विलास धाईंजे गुरुजी , शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौ.प्रणाली बनसोङे उपस्थित होत्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करण्यात आले .सुनील खरात, महेंद्र कांबळे, विठ्ठल कांबळे यांनी शालेय साहित्य आणि खाऊ वाटपामध्ये सहकार्य केले .
यावेळी जंक्शन गावांमधील विद्यार्थी, विद्यार्थिनी यांचे पालक गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ शरयू संजय कुमठेकर मॅडम यांनी केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सौ विजया संदीप जाधव मॅडम यांनी केले तसेच मान्यवरांनी सुद्धा आपल्या भाषणातून स्वातंत्र्य विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास शिक्षिका सौ सुशीला दिलीप काळे मॅडम सौ मंदाकिनी रमेश लोंढे मॅडम सौ सुषमा मच्छिंद्र कुंभार मॅडम यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यामध्ये मोलाचे सहकार्य केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






