Kashmir ITBP Bus Accident Today: जम्मू-काश्मीर : जम्मू-काश्मीरमध्ये चंदनवाडीत आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ३९ जवान प्रवास करत होते. या अपघातात आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
जम्मू-काश्मीर : – जम्मू-काश्मीरमध्ये चंदनवाडीत आयटीबीपीच्या जवानांची बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या बसमध्ये एकूण ३९ जवान प्रवास करत होते. या अपघातात आयटीबीपीचे ६ जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातात ३२ जवान जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने रूग्णालयात हलवण्यात आले आहे. अपघात एवढा भीषण होता की यात ६ आयटीबीपीच्या जवानांचा मृत्यू झाला आहे.

३९ जवानांपैकी ३७ आयटीबीपीचे तर २ जम्मू-काश्मीर पोलिसांचे असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्या बसमध्ये जवान प्रवास करत होते ती सिव्हिल बस होती आणि अचानक ब्रेक निकामी झाल्याने बस रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली
हे जवान चंदनवाडीहून पहलगामच्या दिशेने जात होते. पहलगामच्या फ्रिसलानमध्ये ही बस नदीत पडली आहे. अमरनाथ यात्रेसाठी या भागाच्या सुरक्षेसाठी जवान तैनात करण्यात आले होते. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
बस २०० फूट खोल दरीत कोसळली
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी चंदनवाडीहून ही बस पहलगामच्या दिशेने येत होती. अपघात एवढा मोठा होता की बस चंदनवाडी येथे सुमारे २०० फूट खाली दरीत कोसळसली. त्यानंतर या बसचा स्फोट झाला.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






