जळगाव : – सध्या महाराष्ट्रात घातपात झाल्याचा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे अश्यातच तालुक्यातील जुना कडगाव रोडवरील शेतात संदेश लिलाधर आढाळे नावाच्या तरुणाचा खून केल्याची घटना घडली होती. या गुन्ह्याचा नशीराबाद पोलिसांनी उलगडा केला असून खून करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना सोमवारी दुपारी गावातून ताब्यात घेण्यात आले आहे. बहिणीची छेड काढत असल्याने खून केल्याची कबुली अल्पवयीन मुलांनी पोलिसांसमोर दिली आहे.
बहिणीची छेड काढत असल्यानं भावांनी केली तरुणाची हत्या
जळगाव तालुक्यातील भादली ते जुना कडगाव रोडवरील पाटचारीला लागून असलेल्या शेतात संदेश आढाळे या तरुणाचा १० ऑगस्टला सकाळी ७ वाजता मृतदेह आढळून आला होता. त्याच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा असल्याने त्याचा खून झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी मयत संदेशच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून नशीराबाद गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटना घडल्यापासून भुसावळ येथील उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी प्रकरणात जातीने लक्ष घातले होते. संदेशचे मित्र कोण, त्याच्याशी कोणाचे वाद आहेत काय, यासह त्याला घटनेच्या दिवशी शेवटचा कॉल कोणाचा आला होता, याची संपूर्ण माहिती पोलिसांनी संकलित करण्यात आली होती. या माहितीच्या आधारावर दोन अल्पवयीन मुलांनी हा खून केल्याचे निष्पन्न आले होते. त्यानुसार नशीराबाद पोलिसांनी सोमवारी दोघा मुलांना ताब्यात घेतले. दोघांची चौकशी केली असता, मयत संदेश हा बहिणीला त्रास देत होता. या कारणावरुन त्यास जीवे मारल्याची कबुली अल्पवयीन दोन्ही मुलांनी पोलिसांसमोर दिली. दोघांकडून गुन्ह्यात वापरलेले हत्यार जप्त करण्यात आले असून दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






