प्रतिनिधी : संतोष कदम.
वालचंदनगर :- (ता. इंदापूर ) “अशी पाखरे येती आणि स्मृती ठेवूनी जाती” या स्मृतींना उजाळा देण्यासाठी एसएससी 1998 ची पाखरे परत एकदा शाळेच्या प्रांगणात उतरली. औचित्य होते सोमवार दिनांक 15 ऑगस्ट रोजी झालेल्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे व विद्यार्थी स्नेह मेळाव्याचे. वालचंदनगर मधील श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये माजी विद्यार्थी व आजी-माजी शिक्षक यांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून सुरुवात झाली. विद्यालयातील प्रत्येक माजी शिक्षकास मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात बोलताना माजी प्राचार्य मसलेकर सर यांनी स्नेह मेळाव्याच्या आयोजनाचे कौतुक करून उपस्थित माजी विद्यार्थ्यांचे यश व विद्यालयाच्या यशाबद्दल अभिनंदन केले.
समितीचे अध्यक्ष व विद्यालयाचे माजी विद्यार्थी अमोल गेंगजे साहेब यांनी आपल्या विद्यार्थी दशेतील शिक्षक व शाळेच्या स्मृती जागून भावनिक केले. तसेच वालचंदनगर इंडस्ट्रीजचे प्लांट हेड व विद्यालयाचे माजी विद्यार्थी धीरज केसकर साहेब यांनी असेच कार्यक्रमाचे आयोजन करत राहावे यासाठी आवाहन केले. या कार्यक्रमासाठी लागणारे आवश्यक सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. विद्यालयातील माजी शिक्षकांनी आपल्या कुटुंबासमवेत नियमित वालचंदनगरला भेट द्यावी यासाठी कंपनीमार्फत आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन याप्रसंगी दिले. येणाऱ्या काळात सर्वच माजी विद्यार्थी व माजी शिक्षक यांचा भव्य दिव्य स्नेह मेळावा आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला.
विद्यालयाचे विद्यमान प्राचार्य हनुमंत कुंभार यांनी अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा प्रदान करून, विद्यार्थी हा शाळेचा ‘श्वास’ असल्याचे सांगून विद्यालयात परत येण्याचे निमंत्रण दिले. विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बोलताना राहुल गरये यास अश्रू अनावर झाले आपल्या मनोगतात-ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो तेथे काहीतरी करण्याचे सौभाग्य लाभल्याबद्दल समाधान व्यक्त केले.
या स्नेह मेळाव्याचे आयोजन माजी विद्यार्थी विनोद शिवशरण यांनी केले होते.
माजी शिक्षक प्रकाश बोकील यांच्यासह जवळपास 75 शिक्षक व 100 माजी विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी माझी अधीक्षक व पत्रकार अतुल तेरखेडकर, विजय साळुंखे, मीना कुलकर्णी, सुलक्षणा शहा, सौ एस एस कुलकर्णी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी शहेन शहा, अतुल वाघ, योगिता अवधानी यांनी कष्ट घेतले तर सूत्रसंचालन टिकळे व मुळे यांनी केले.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






