आ.विनायकराव मेटे यांच्या घात की अपघात उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी म्हणून एरंडोल येथे दिले निवेदन

Spread the love

झुंजार। प्रतिनिधी
एरंडोल :-
दिनांक 16 /08/2022 रोजी मंगळवारी एरंडोल येथे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष तथा मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारे समाजाला न्याय मिळवण्यासाठी प्रखर विचारांचे नेतृत्व माननीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांचे दिनांक 14 /08/20 22 रोजी सकाळी अपघाती निधन झाले. मराठा समाजाचे न भरून येणारे नुकसान झाले आहे

असे व्यक्तीमत्व जन्माला यायला व घडायला खूपच कालावधी जात असतो . सामाजिक कार्यात स्वतःला वाहून नेणाऱ्या व्यक्ती या समाजात खूपच कमी असतात आणि ज्या असतात त्यांचं पैकी एक म्हणजेच विनायकराव मेटे. त्यांच्या या पावन स्मृतीस व मराठा समाजाला एक बळ प्राप्त करून देणाऱ्या लढवय्या नेतृत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली म्हणुन एरंडोल येथे पोलीस स्टेशन ग्राउंड मध्ये शोकसभा आयोजीत करण्यात आली होती .

त्या शोकसभेत भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच पोलीस स्टेशनचे पी .आय. ज्ञानेश्वर जाधव यांना मराठा महासंघ , संभाजी ब्रिगेड , छावा, राजमाता जिजाऊ महिला मंडळ , जिजाऊ ब्रिगेड , मराठा सेवा संघ , मराठा क्रांती मोर्चा , सकल मराठा समाज एरंडोल या संघटनेंकडून निवेदन देण्यात आले की सदरील अपघात हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता आहे .कारण हा अपघात घडण्यापूर्वी व अपघात झाल्यानंतर ज्या ज्या अनेक संशयास्पद बाबी समोर आलेल्या आहेत त्यामुळे कदाचित हा घातपात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे .

या निवेदनाद्वारे शासनाला निवेदन देण्यात आले की संबंधित अपघाताची चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात यावी व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले

या शोक सभेसाठी व निवेदन देण्यासाठी डॉ. सुरेश पाटील ,रवींद्र पाटील , आर एस पाटील, संभाजी देसले , अभिजित पाटील , दिनकर पाटील , राकेश पाटील, पंकज पाटील , विकास पाटील , अजय पाटील ,राजेंद्र शिंदे , वाल्मीक सोनवणे ,डी एस पाटील , समाधान पाटील ,शिवाजीराव अहिरराव , शेखर पाटील, समाधान पाटील, भाईदास पाटील , आर. झेड. पाटील हे सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होती.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार