प्रतिनिधी – संतोष कदम.
फलटण :- ( जि. सातारा ) विधवा महिलांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या, अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरेवर आम्ही या अभियाना मार्फत समाजाचे व महाराष्ट्र शासनाचे लक्ष वेधू इच्छित आहोत.
विधवा महिलांसाठी सुरू असलेली ही अनिष्ट प्रथा म्हणजे, पतीच्या निधनानंतर अंत्यविधीच्या वेळी, मृताच्या पत्नीच्या अंगावरील तिच्या सौभाग्याचे लेणे असलेले तिच्या कपाळावरील कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे, हातातील बांगड्या फोडणे, पायातील जोडवी काढणे ही होय. पुरोगामी महाराष्ट्रात ही प्रथा आजही आस्तित्वत आहे. पतीला अग्नी दिला जात असताना, विधवा महिलेच्या सौभाग्याची ही आभुसने काढून घेतली जात असताना, त्या स्त्रीच्या मनाला किती वेदना होत असतील याची कल्पना करवत नाही. असा वाईट प्रसंग, कोणत्याही महिलेवर येणे ही तिच्यासाठी अत्यंत वेदनादायी घटना आहे.
पतीच्या निधनानंतर विधवा महिला विद्रूप दिसावी, तिच्या कडे कोणी वाईट नजरेने पाहू नये असा कदाचित त्याकाळी या प्रथेमागे हेतू असेल. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. महिला मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित झाल्या आहेत, अंधश्रध्दा कमी होवून समाज विज्ञानवादी होत आहे, त्यामुळे अशा अनिष्ट प्रथा, परंपरा आता बदलल्या पाहिजेत असे आम्हास वाटते. विधवा महिलांना त्यांच्या उर्वरित आयुष्यात अशा अनिष्ट प्रथामुळे, खूप त्रास सहन करावा लागतो. कुटुंबात त्यांचे स्थान दुय्यम होते. त्यांना हळदी कुंकवाच्या, देवधर्माच्या वा कोणत्याही शुभ कार्यात बोलावले जात नाही, उलट त्यांना अशा कार्यक्रमात डावलले जाते. त्यांना इतर महीलांप्रमाने कपडे परिधान करता येत नाही, नटने मुरडणे करता येत नाही तसेच समाजात मोकळे पणाने वावरताही येत नाही. महिला विधवा झाली म्हणजे रंडकी झाली असे म्हणून तिला समाजाच्या मुख्य प्रवाहातून बाद करणे हे अन्यायकारक आहे.
पुरोगामी महाराष्ट्राला अशा अनिष्ट रूढी शोभणाऱ्या नाहीत. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी आम्ही ही चळवळ सुरू केली आहे. त्यासाठी आम्ही सामाजिक संस्था, संघटना, महिला संघटना, बचतगट, महिला मंडळे, सरपंच ग्रुप यांच्या माध्यमातून या अनिष्ट प्रथेविरुध्द, समाजात प्रबोधन घडवून आणण्याचे मोठे काम सद्या, सोशल मीडियाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात हाती घेतले आहे. कोरोनाचे संकट कमी झाल्यानंतर, महाराष्ट्रभर आम्ही यासाठी कार्यशाळांचे आयोजन करणार आहोत. मात्र, शासनाच्या मदतीशिवाय हे काम पुढे जाणार नाही याची आम्हास खात्री आहे. त्यामुळे ही प्रथा बंद करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कायदा करावा व महाराष्ट्रात सुरू असलेली ही अनिष्ट प्रथा बंद करावी अशी विनंती आम्ही या पत्राद्वारे आपणास करीत आहोत. तरी आपण, याबाबत योग्य ती कार्यवाही हाती घ्यावी ही विनंती.
असे ग्रामपंचायत ठराव सदर महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात तालुक्यात गावात होत आहेत तरी आपल्या तालुक्यात प्रत्येकी ग्रामपंचायत मध्ये लागू करावेत असे विनंती अर्ज
ग्रामसेवक संघटना तालुका फलटण अध्यक्ष मा.गणेश दडस ग्रामसेवक,मा. हिम्मतराव गायकवाड, रणपिसे,खाडे,आढाव,खटके,कारंडे,यांच्या कडे केली आहे.
हे निवेदन फलटण विधानसभा अध्यक्ष प्रदीप उर्फ प्रेम सुरेश मोरे,सचिव मा. गॊतम भोसले, कोषाध्यक्ष मा.प्रविण विटकर,उपाध्यक्ष मा. दिनेश कांबळे, बि.व्हि.एफ.मा.संदीप सोणवणे, भाईचारा अध्यक्ष मा.किरण हॊसारे,फलटण शहर संघटक मा.सुहास काकडे विधानसभा महासचिव मा.प्रकाश गिरी,मा.संतोष मोरे तसेच जिल्हा पदाधिकाऱ्यासह मा.उदयजी काकडे व मा.मंगेशजी मोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली सदर निवेदन देण्यात आले
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






