Nashik Central Jail: काही दिवसांपूर्वी पुण्याच्या येरवडा कारागृहातून नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल झालेल्या कैद्यांनी ही मारहाण केली आहे. यामध्ये प्रभूचरण पाटील हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे. १० ते १२ कैद्यांनी हा जीवघेणा हल्ला केल्याने कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्यांचा सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.
हायलाइट्स:
- पोलिसावर कैद्यांचा जीवघेणा हल्ला
- नाशकातील मध्यवर्ती कारागृहातील प्रकार
- दगडाने डोकं फोडलं, लाथाबुक्क्यांनी मारहाण
नाशिक: – बंदी वादी कैद्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांवर जीव घेणा हल्ला करण्यात आला आहे. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यात प्रभूचरण पाटील हे पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. दहा ते बारा कैद्यांनी त्यांच्यावर हा जीवघेणा हल्ला केल्याची माहिती आहे. ज्यामध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आहे.
बॅरेक का चेंज केलं, असा सवाल या पोलीस कर्मचाऱ्याने या कैद्यांना केला होता. त्यावरुन या कैद्यांनी प्रभू चरण पाटील या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केली. खुनाच्या गुन्ह्यातील या आरोपींनी ही मारहाण केल्याची माहिती आहे.
येरवडा जेलमधून नाशिकच्या जेलमध्ये बंदी वादी कैदी एक महिन्यांपूर्वीच दाखल
पुण्याच्या येरवडा जेलमधून नाशिकच्या जेलमध्ये बंदी वादी कैदी एक महिन्यांपूर्वीच आणण्यात आले होते. ज्या कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केलायं हे सर्व कैदी बंदी वादी असल्याची देखील माहिती मिळते आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव प्रभूचरण पाटील असल्याचे सांगितले जात आहे. सध्या त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू असून ते गंभीर जखमी झाले आहेत.
नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकारानंतर भीतीचे वातारण
आर्श्चयकारक बाब म्हणजे या एका पोलिस कर्मचाऱ्यावर तब्बल दहा ते बारा कैद्यांनी मिळून हल्ला केलायं. नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहातील धक्कादायक प्रकारनंतर भीतीचे वातारण निर्माण झाले आहे. कारागृहात आता पोलीस कर्मचारीच सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे. मात्र, या बंदी वादी कैद्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर नेमका कोणत्या कारणावरून हल्ला केलायं, हे अध्याप कळू शकले नाहीयं.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






