प्रतिनिधी – संतोष कदम.
शेळगाव :- ( ता. इंदापूर ) इंदापूर तालुक्यातील शेळगाव फाटा येथे जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर उड्डाणपुलाचे काम चालू आहे सदर उड्डाणपुलाची उंची वाढवण्यात यावी याकरिता पंचक्रोशीतील सर्वपक्षीय शेतकऱ्यांनी इंदापूर बारामती रोडवरील शेळगाव फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाला उड्डाणपुलाचे होत असलेले काम त्वरित थांबून त्यामध्ये दुरुस्ती करावी या मागणी करिता आंदोलन केले गेले .

यावेळी भारतीय किसान मोर्चाचे पश्चिम महाराष्ट्राचे प्रमुख माऊली काका चवरे ,निरा भीमा सहकारी कारखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार ,भाजपा अध्यात्मिक आघाडीचे प्रदेश पदाधिकारी बाबा महाराज खारतोडे ,भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश सचिव आकाश कांबळे, ॲड. नितीन कदम ,संतोष कांबळे सचिव भाजपा अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्यात तथा प्रभारी बारामती लोकसभा मतदारसंघ शिरसाटवाडी चे सरपंच नाना रावण, संतोष ननवरे ,पोलीस पाटील भागवतराव भुजबळ ,अंकुश धापटे, संतोष भांगे ,ॲड बापूसाहेब साबळे, जिल्हा परिषद सदस्य मोहन दुधाळ आणि शेळगाव पंचक्रोशीतील नागरिक युवा कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने रास्ता रोको आंदोलनामध्ये सहभागी झाले होते .

यावेळी इंदापूर तहसील ऑफिसचे नायब तहसीलदार ठोंबरे साहेब, वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लातूरे साहेब ,तलाठी सर्कल भाऊसाहेब ,रोडचे अधिकारी हे निवेदन घेताना उपस्थित होते .रास्ता रोको आंदोलनाच्या अगोदर सकाळी ठीक अकरा वाजता सामूहिक राष्ट्रगीत घेण्यात आले.

हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






