सोयगाव,दि.१९ …
शहराच्या जवळच असलेल्या बनोटी रस्त्यावरील पाझर तलावाच्या संरक्षण भिंतीच्या पायथ्याजवळ शुक्रवारी भगदाड पडल्याने या तलावातील पाण्याचा अपव्यय होवून तलावाच्या पाण्याला गळती लागली आहे.आधीच सोयगाव तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणे व पाझर तलावे कोरडीठाक असून भरलेल्या तलावाला भगदाड पडल्याने चिंतेचे वाताव्राण पसरले आहे.
सोयगाव शहराजवळील बनोटी रस्त्याला लागून असलेल्या गवळण नाल्यावरील पाझर तलावाच्या भिंतीच्या पायथ्याशी भगदाड पडल्याने तलावातील पाणी वाहून जात असून पाण्याची गळती वाढली आहे.या तलावाच्या पायथ्याशी तब्बल १५० हेक्टर शेत जमीन आहे.सोयगाव तालुक्यात पाण्याचे अत्यल्प प्रमाण असल्याने या तलावाच्या पाण्यामुळे विहिरींना पाण्याची कमतरता भासणार नसून मात्र तलावाला भगदाड पडून पाणी सर्रास वाहून जात असल्याने या तलावाच्या पाण्याच्या गळतीमुळे तलाव कोरडाठाक होण्याची भीती व्यक्त होत आहे.
तलावात पाणीच पाणी…परंतु गळती वाढली—
जलसंपदा विभागाने गवळण नाल्यावरील उभारलेल्या या पाझर तलावात पाणीच पाणी आहे परंतु या तलावाच्या संरक्षण भिंतीला जलसंपदा विभागाने उन्हाळ्यात डागडुजी न केल्याने या भिंती जवळ गळती सुरु झालेली असून या पाण्याच्या गळतीमुळे भिंतीला धोका निर्माण झालेला असल्याचे परिसरातील शेताकायांनी सांगितले…
पिकांसाठी या तलावाच्या पाण्याचा फायदा होत आहे परंतु पाण्याचीच गळती वाढल्याने पावसाळा संपल्यानंतर पितृ पक्षात मात्र हा तलाव कोरडा झाल्यावर परिसरातील शेतकऱ्यांची चिंता वाढणार आहे.जनावरांना पिण्यासाठी पाण्याचाही या तलावाचा उपयोग होत आहे….
जलसंपदा विभागाचे दुर्लक्ष-
जलसंपदा विभागाने या तलावाची उभारणी केल्यापासून एकदाही या तलावाची डागडुजी केलेली नाही त्यामुळे कागदपत्री डागडुजी दाखवून या तलावाच्या दुरुस्तीसाठी आलेला मलिदा खाण्यात आल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.

हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






