विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही-आ.चिमणराव पाटील.एरंडोलला विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

Spread the love

झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-
आगामी काळात राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून शहरासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होणार असल्यामुळे भविष्यकाळात विकासाची घौडदौड वेगाने सुरु राहणार असल्याचे आमदार चिमणराव पाटील यांनी सांगितले.शहरात सुमारे आठ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि पूर्ण झालेल्या कामांचे लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.भाजपचे जनजातीय क्षेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर अध्यक्षस्थानी होते.यावेळी आमदार चिमणराव पाटील,अँड.किशोर काळकर यांच्याहस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण करण्यात आले.

यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्यात भाजप सेना युतीचे सरकार सत्तेवर आले असल्यामुळे विकासकामांसाठी निधीची कमतरता जाणवणार नाही अशी ग्वाही दिली.सत्ता विकासाचे प्रमुख केंद्र असून त्याचा विकासासाठी उपयोग करून घेणे गरजेचे असल्याचे सांगितले.शहरात यापूर्वी शासनाच्या माध्यमातून व नगरपालिकेच्या सहकार्याने सुमारे पंचवीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून विविध विकासकामे पूर्ण झाली आहेत तर अनेक कामे वेगाने सुरु असल्याचे सांगितले.मागील काळात नगरपालिकेत भाजपची सत्ता असतांना त्यांनी विकासकामांसाठी सहकार्य केल्याचे सांगितले.

अंजनी प्रकल्प आणि पद्मालय क्रमांक दोनच्या कामांसाठी एका महिन्यात सुमारे सहाशे कोटी रुपयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली असल्यामुळे शेतक-यांसाठी सिंचनाची सोय उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.शहरातील नवीन पाणी पुरवठा योजनेसाठी २७ कोटी रुपयांची मंजुरी लवकरच मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी अँड.किशोर काळकर यांनी आमदार चिमणराव पाटील मतदारांच्या मनातील मंत्री असल्यामुळे त्यांना लवकरच मंत्रीमंडळात संधी मिळेल असा विश्वास व्यक्त केला.

शहरात विकासकामे करतांना सर्वांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवले असल्याचे सांगितले.शहरातील स्मशानभूमी,आठवडे बाजार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,सार्वजनिक उद्यान यांचे सौंदर्यीकरण करण्यात आल्यामुळे शहराच्या विकासात मोठी भर पडली असल्याचे सांगितले.पालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विकास नवाळे यांनी प्रास्ताविक केले.कार्यालय अधिक्षक हितेश जोगी यांनी सुत्रसंचलन केले.

नवीन वसाहत आणि गांधीपुरा भागातील सार्वजनिक उद्यानाचे भूमिपूजन,कासोदा दरवाजा येथील स्मशानभूमीच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन,माझी वसुंधरा चौकाचे लोकार्पण,स्मशानभूमी आणि आठवडे बाजार येथे इलेक्ट्रिक सोलर विद्युतीकरणाचे भूमिपूजन,आठवडे बाजार चौकाचे लोकार्पण,आणि पेव्हर ब्लॉक बसविणे आणि कामांचा शुभारंभ व लोकार्पण आमदार चिमणराव पाटील,अँड.किशोर काळकर,जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी यांचेहस्ते करण्यात आले.

यावेळी अल्प कालावधीत शंभर फुट ध्वजस्तंभाचे काम पूर्ण करणा-या कर्मचा-यांचा आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष रवींद्र महाजन,आनंदा चौधरी (भगत),माजी सरपंच रवींद्र जाधव,सामाजिक कार्यकर्ते संभाजी पाटील,माजी नगराध्यक्ष जयश्री पाटील,माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील,जहिरोद्दिन शेख कासम,राजेंद्र महाजन,चिंतामण पाटील,प्रमोद महाजन,योगेश महाजन,छाया दाभाडे,आनंद दाभाडे,

अमोल जाधव,पारोळा तालुका आत्मा कमिटीचे अध्यक्ष मधुकर पाटील,विकास बोरसे,मयूर महाजन,कृष्णा ओतारी,संजय पाटील,राजेंद्र चौधरी यांचेसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्व कार्यक्रमस्थळी आमदार चिमणराव पाटील व पदाधिका-यांची फटाके फोडून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.

टीम झुंजार