सुमित पाटील वावडदा (प्रतिनिधी)
आज दिनांक २१/०८/२०२२ रोजी नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव तर्फे सोनबर्डी येथील सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेला दिला मदतीचा हात. सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेची अत्यावश्यक गरज ओळखून नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेने दैनंदिन जीवनात लागणाऱ्या किराणा वस्तूंचे वाटप केले.सहवास मतिमंद निवासी मुलांची संस्था म्हणजे सहवास-
प्रौढ विशेष मुलांचे निवासी पुनर्वसन संकुल…
हे कार्य आर्थिकदृष्ट्या कमकुवत पालकांच्या प्रौढ विशेष मुलांसाठी सुरु आहे.शासनाचे कोणतेही अनुदान या संस्थेला नाही… समाजात असणारे समंजस, समजशील आणि माणुसकी जिवंत असणाऱ्या लोकांच्या सहकार्याने ह्या मुलांचे जगणे सुसह्य होतंय.. सेवाभावी परिवार या कार्याला सांभाळून आहेत. सावंत परिवाराने
मानवसेवेचे व्रत अंगीकरलेले आमटे परिवारचे आदर्श ठेऊन समाजात सावंत परिवार प्रौढ विशेष मुलांचे पालक झाले आहेत.
सहवास मतिमंद निवासी मुलांच्या संस्थेला भेट दिली असता तेथील संस्थापक समाधान सावंत यांनी संस्थेचे कार्याची माहिती दिली. या ठिकाणी राज्यभरातील विविध दिव्यांग जे निराधार आहेत अशांना आधार देऊन संस्थेच्या संस्थापकांनी माणसाने माणसाशी माणसासम वागणे याची प्रचिती दिली. यावेळी अध्यक्षा मनिषा पाटील सचिव ज्योती राणे,

सदस्य नूतन तासखेडकर, माधुरी शिंपी, भारती कापडणे, किमया पाटील उपस्थित होत्या. या उपक्रमासाठी सर्व कार्यकारणी सदस्य व उर्मिला सोनी, डॉ सुहासिनी महाजन,नेहा जगताप, या सर्वांचे आर्थिक सहकार्य लाभले. विशेष शिक्षक संस्था अध्यक्ष समाधान सावंत, सौ मनिषा सावंत व्यवस्थापक विश्वनाथ सावंत काळजी वाहक आनंद वसईकर, रंजना सावंत, हिलाल सावंत हे उपस्थित होते.
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






