जळगाव (प्रतिनिधी) : – जळगाव जिल्ह्यातील खुनाची मालिका अद्यापही थांबलेली नाही. अश्यातच जळगाव शहर खुनाच्या घटनेनें हादरलं असून भर दिवसा शहरातील शिवकॉलनी येथे दारूच्या अड्ड्यावर किरकोळ कारणावरून वाद होऊन एका २३ वर्षीय तरुणाचा चाकूने चॉपरने भोसकण्यात वार करून खून केल्याची धक्कादायक घटना आज रविवार दिनांक २१ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली, घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव अक्षय अजय चव्हाण (वय २३) राहणार पिंप्राळा असे आहे. शिव कॉलनी चौकासमोरील दारूच्या अड्ड्यावर त्याचा एकाशी वाद झाला. त्या वादातून बाळा पवार नामक व्यक्तीने त्याला चाकूने भोसकत खून केल्याची घटना घडली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीनी दिली. घटनास्थळाची पोलीस निरीक्षक अरुण धनवडे, पीएसआय प्रदीप चांदेलकर यांनी पाहणी केली.
वाद वाढल्याने दोन्ही गटातील १०-१५ तरुणांमध्ये चांगलीच हाणामारी झाली. भारत बंडू राठोड या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार, ५.३० च्या सुमारास मोबाईलच्या जुन्या वादातून काही तरुणांचा वाद झाला. मी मध्यस्थी करण्यासाठी गेलो असता आणखी तरुण त्यात पडले. अक्षय चव्हाण या तरुणाने बाळू पवार याच्या भावाच्या डोक्यात दगड मारला. भावाला मारल्याच्या रागातून बाळू पवार याने चॉपरच्या साहाय्याने अक्षय चव्हाण या तरुणावर वार केले.
जखमी तरुणास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी आणले असता तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. नम्रता अच्छा यांनी त्यास मयत घोषित केले. दरम्यान, रुग्णालयात नातेवाईकांची मोठ्या प्रमाणात गर्दी निर्माण झाली होती. घटनेची पोलीस माहिती घेत आहेत.
हे वाचलंत का ?
- एरंडोल येथे खोट्या कारवाईचा बनाव करून चहा विक्रेत्याकडून १० हजारांची खंडणी; आ.अमोलदादा पाटील यांचे चार तास पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
- प्रत्येक बी.एल.ए.ने घराघरात जाऊन मतदारांची अचूक पडताळणी करा – आमदार मा.ॲड.अमोलदादा पाटील.
- एरंडोलला शिवसेनेने दिग्गजांना दिली पक्षीय जबाबदारी…
- एरंडोल येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.
- युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ.नरेंद्र ठाकुर व प्रभाग क्रमांक ३ चे उमेदवार यांच्या प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली व कॉर्नर सभाचे आयोजन.






