झुंजार । प्रतिनिधी
एरंडोल-देशाच्या संरक्षणासाठी स्वत:चे आयुष्य पणाला लावणा-या निवृत्त सैनिकांचा सन्मान करणे हा उपक्रम सर्वाना प्रेरणा देणारा असल्याचे प्रतिपादन आमदार चिमणराव पाटील यांनी केले.मरिमाता चौक मित्र मंडळ,माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे आणि त्यांच्या परिवारातर्फे दहीहंडीचे आयोजन करून निवृत्त जवानांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते.गुजर समाजाचे अध्यक्ष गोपाल गुजर अध्यक्षस्थानी होते.
भाजपचे जनजातीय खेत्राचे प्रमुख अँड.किशोर काळकर,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा,मनोज पाटील,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव प्रमुख पाहुणे होते.यावेळी शहरातील तीस निवृत्त जवानांचा स्मृतीचिन्ह प्रदान करून सत्कार करण्यात आला.मरिमाता चौक मित्र मनादल आणि सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे,माजी नगरसेविका छाया दाभाडे व परिवारातर्फे दरवर्षी गोकुळाष्टमीनिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते.आमदार चिमणराव पाटील,अँड.किशोर काळकर,पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव,सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश आहिरे,पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्याहस्ते भगवान श्रीकृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी आमदार चिमणराव पाटील यांनी निवृत्त जवानांचे देशावर आणि नागरिकांवर मोठे उपकार असल्याचे सांगितले.भारतीय जवान विविध संकटांचा सामना करून सीमेवर देशाचे संरक्षण करण्यासाठी सज्ज राहत असल्याचे सांगितले.युवकांनी भारतीय जवाच्या संघर्षाचा आद्राश डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे असे आवाहन केले.राजकीय जिवनात प्रत्येक क्षेत्रात ज्यांच्याशी संघर्ष केला त्या विरोधी पक्षांशी हातमिळवणी करून अनैसर्गिक युती करून सत्तेवर बसल्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बाहेर पडलो असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात सत्तेवर आललेले सरकार भाजप शिवसेना युतीचे खरे असून आता खरी नैसर्गिक युती झाली असल्याचे स्पष्ट केले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री यांनी दहीहंडीस साहसी खेळाचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.भाजपचे अँड.किशोर काळकर यांनी आनंद दाभाडे आणि छाया दाभाडे यांनी निवृत्त सैनिकांचा सत्कार करून समाजासमोर आदर्श उभा केला असल्याचे सांगितले.आमदार चिमणराव पाटील यांचा ज्यावेळेस शहरात कार्यक्रम आयोजित करण्यात येतो त्यावेळेस त्यांनी राज्य शासनाच्या माध्यमातून विकास कामांसाठी नवीन विकास कामे मंजूर करून आणले असल्याचे सांगून अनेक उदाहरणे दिलीत.राज्यातील भाजप आणि शिवसेना युती सरकारच्या माध्यमातून शहरात सुरु असलेली विकास कामांची घौडदौड यापुढील काळात अधिक वेगाने सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी अंश दाभाडे या विद्यार्थ्याने सैनिकांविषयी इंग्रजीत व्यक्त केलेल्या भावना कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.माजी उपनगराध्यक्षा छाया दाभाडे यांनी प्रास्ताविक केले.पियुष चौधरी यांनी सुत्रसंचलन केले.कार्यक्रमास माजी नगरसेवक डॉ.नरेंद्र पाटील,प्रमोद महाजन,पापा दाभाडे,तेली समाजाचे शहराध्यक्ष राजेंद्र चौधरी,माजी नगराध्यक्ष नाना मिस्तरी,परशुराम महाजन,अमोल तांबोळी,सुरेश दाभाडे यांचेसह नागरिक उपस्थित होते.कार्यक्रमासाठी मरिमाता चौक मित्र मंडळ,आनंदभैय्या मित्र मंडळ,रामभैया मित्र मंडळाच्या पदाधिका-यांनी सहकार्य केले.

फोटो ओळी-एरंडोल येथे आयोजित करण्यात आलेल्या माजी सैनिकांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थित आमदार चिमणराव पाटील,अँड.किशोर काळकर,आनंद दाभाडे,छाया दाभाडे व निवृत्त सैनिक.






