प्रतिनिधी – संतोष कदम.
गंगापूर – (जि. औरंगाबाद) वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा गंगापूर तालुका निरिक्षक रामेश्वर तायडे हे गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकी संदर्भात पक्षाच्या तालुका कार्यकारिणी कडुन आढावा घेण्यासाठी आज गंगापूर शहरात आले असता वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेस मध्ये गेलेले देविदास लांडे पाटील व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी आज पुन्हा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश केला .
त्यांचे जिल्हाध्यक्ष योगेश बन, जिल्हा महासचिव पंकज बनसोडे,शाम भारसाखळे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, जिल्हा उपाध्यक्ष तथा गंगापूर तालुका निरिक्षक रामेश्वर तायडे, गंगापूर तालुकाध्यक्ष युनुस पटेल, जिल्हा कार्यकारिणी सदस्य बाबासाहेब वक्ते, गंगापूर शहराध्यक्ष सुशीलकुमार शिराळे, तालुका महासचिव बाबासाहेब दुशिग,तालुका उपाध्यक्ष दत्ता गायकवाड,संतोष जाधव,ता सचिव कान्हु भालेराव, तालुका संघटक शांतावन उबाळे, तालुका सचिव किशोर बनकर, सचिन भुजंग, रविंद्र सोनवणे, सईद बाबा पठाण,अमोल केदारे आदींनी अभिनंदन केले आहे.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






