रामपूरवाडीत गावरान (हातभट्टी) वर छापा…एकावर गुन्हा दाखल

Spread the love


सोयगाव, दि.२२..पोळा आणि गणेशोत्सव सणांच्या पार्श्वभूमीवर सीयगव पोलीस अलर्टमोड वर आले असून अवैध दारूविक्री करणाऱ्यांवर मेहेरनजर ठेवली असून रविवारी रामपूरवाडी ता सोयगाव येथे गावरान(हातभट्टी) वर छापा घालून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आगामी सण उत्सव काळात सोयगाव तालुक्यात शांतता व सुव्यवस्था राहावी यासाठी आता अवैध धंद्याविरुद्ध मोहीम राबविण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी सांगितले त्यामुळे अवैध धंदे वाईकचे धाबे दणाणले असून रविवारी गुप्त खबऱ्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार रामपूर वाडी येथील अर्जुन रमेश वाघ हा गावरान(हातभट्टीची) अवैध दारू आठ लिटर किंमत दोन हजार रु असा मुद्देमाल कब्जात बाळगून चोरट्या मार्गाने विक्रीसाठी बाळगत असल्याचं आढळून आल्याने त्यास रंगेहात पकडून मुद्देमाल हस्तगत केला

असून त्याच्याविरुद्ध सोयगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश पंडित,राजू बर्डे, अजय कोळी,रवींद्र तायडे आदींनी ही कार्यवाही केली आहे

हे पण वाचा

टीम झुंजार