सोयगाव, दि. आगामी पोळा आणि गणेशोत्सव दारूमुक्त वातावरणात साजरा करण्यासाठी सोयगाव पोलिसांचे अवैध दारू विक्रीवर लगाम घालण्यासाठी एक पथक नियुक्त करण्यात आले असून मंगळवारी या पथकाने नांदगाव तांडा ता सोयगाव येथे गावरान(हातभट्टीची) अवैध दारू दहा लिटर कब्जात बाळगून विक्रीच्या उद्देशाने रंगेहात पकडून त्याचे कडून अंदाचे दोन हजार रु चा मुद्देमाल हस्तगत केला आहे
देवमन किसन सोनवणे वय 45 वर्ष रा.नांदगाव ता. सोयगाव असे गावरान अवैध दारूविक्री करतांना आढळून आलेल्या चे नाव असून मंगळवारी त्यास पोलिसांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मौजे नांदगाव येथे घराचे बाजूला सदर इसम अवैध दारूची विक्री करतांना रंगेहात आढळून आला आहे.त्याच्याकडून 2000/- रुपये किमतीच्या 10 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत करण्यांत आली आहे.
पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांच्या पथकातील अजय कोळी,उपनिरीक्षक सतीश पंडित, राजू बर्डे, आदींच्या पथकाने ही कार्यवाही केली आहे.
—गणेशोत्सव आणि पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर सोयगाव पोलिसांचे अवैध दारूविक्री विरोधात पथक स्थापन करण्यात आले असून अवैध दारू विक्रीचा प्रकार आढळुन आल्यास सोयगाव पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक अनमोल केदार यांनी केले असून बातमीदार चे नाव गुप्त ठेवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले
हे पण वाचा
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






