चोपडा :- सध्या राज्यासह जळगाव जिल्ह्यात महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये. अशातच आता जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आलीय. चोपडा शहरात बहिणीकडे रहायला आलेल्या एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष देवून पळवून नेवून वेगवेगळ्या ठिकाणी ३ वेळा शारीरीक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पिडीत मुलीला तिच्या मूळगावी सोडले. यानंतर पीडित मुलीने पोलीस स्टेशन गाठले. पीडितेच्या फिर्यादीवरून सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा रा.कालीकुंडी ता. वरला जि. बडवाणी (मध्य प्रदेश) याच्यावर चोपडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गेल्या जुलै महिन्यात मध्य प्रदेशातून पिडीत मुलगी तिच्या बहीणीकडे चोपडा येथे राहायला आली होती. पीडितेच्या बहिणीने, “गावामध्ये तु सचिनच्या नावाने बदनाम झाली” असे सांगितल्याने दोघींमध्ये भांडण झाले. त्यामुळे पीडित तरुणीने आरोपी सचिन ऊर्फ टिंग्लया मेवा यास फोन करुन तिला घेवुन जाण्यास सांगितले. त्याप्रमाणे दिनांक २९ जुलै २०२२ रोजी पिडिता चोपडा शहर बस स्थानकावर आल्यानंतर, संशयित आरोपी सचिन याने सदर ठिकाणी येवुन पीडित तरुणीस तुझ्यासोबत लग्न करायचे असल्याचे सांगुन तिला बसने लकडीया (महाराष्ट्र) येथे नातेवाईकांकडे घेवुन गेला.
दरम्यान याठिकाणी एक दिवस राहील्यानंतर हरीयाणा येथील संशयित आरोपी सचिन याचा मित्र राहुल यांच्या घरी ४ दिवस राहीले. त्या ठिकाणी संशयित आरोपी याने पीडित तरुणीच्या संमतीशिवाय ३ वेळा शारीरीक संबंध केले. त्यानंतर तेथुन सेंधवा (मध्य प्रदेश) येथे आरोपीच्या नातेवाईकाच्या घरी येवुन तेथे देखील संशयित आरोपी याने शारीरीक संबंध केले.
यानंतर वरला येथे मुळगावी आल्यानंतर पीडित तरुणीने वरला पोलीस स्टेशन जि. बडवानी मध्य प्रदेश येथे दिनांक ६ ऑगस्ट २०२२ रोजी तक्रार दिली असुन, वरला पोलीस स्टेशन येथे ०० / २०२२ प्रमाणे सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाची कागदपत्रे वरिष्ठ कार्यालयामार्फतीने आज रोजी चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे प्राप्त झाली आहेत. याप्रकरणी पुढील तपास पो.नि संतोष चव्हाण हे करीत आहेत.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






