डि.एस.एम. परीक्षेत जे. एस. जाजू विद्यालय उत्राणचे शिक्षक भरत शिरसाठ केंद्रात प्रथम

Spread the love

एरंडोल :- मुख्याध्यापक पदाची पात्रता परीक्षा असलेल्या डिप्लोमा इन स्कूल मॅनेजमेंट (डीएसएम) अभ्यासक्रमाचा निकाल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठामार्फत नुकताच घोषित करण्यात आला. सदर परीक्षेमध्ये जे. एस. जाजू हायस्कूल उत्राणचे शिक्षक भरत आत्माराम शिरसाठ हे म्हसावद केंद्रामध्ये प्रथम येऊन 72 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाले.

भरत शिरसाठ हे इंग्रजी आणि शिक्षणशास्त्र या दोन विषयांमध्ये सेट परीक्षा सुद्धा उत्तीर्ण आहेत. साहित्यिक असलेल्या श्री शिरसाठ यांची इंग्रजी आणि मराठी भाषेमध्ये पाच पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या या यशाबद्दल श्री. ए. एस. गोसावी, केंद्र संचालक शालेय व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम म्हसावद तालुका जिल्हा जळगाव, एरंडोल शिक्षण प्रसारक मंडळ, जे एस जाजू हायस्कूल उत्राण येथील मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी, महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव, इंग्लिश टीचर्स वेल्फेअर असोसिएशन जळगाव व समतावादी साहित्य शिक्षक मंडळ जळगाव इत्यादींनी अभिनंदन केले आहे.

हे वाचलंत का ?

टीम झुंजार