विभागीय कृषी सहसंचालकांची एरंडोल तालुक्यात पिक प्रात्यक्षिकांना भेट व पाहणी.

Spread the love

झुंजार प्रतिनिधी । एरंडोल– नासिकचे विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांनी तालुका कृषी विभागामार्फत राबविलेल्या विविध प्रकल्पांची पाहणी केली.यावेळी सहसंचालक मोहन वाघ यांनी विविध मार्गदर्शक सुचना करून राबवलेल्या उपक्रमांबद्दल समाधान व्यक्त केले.सहसंचालक मोहन वाघ यांनी तालुका कृषी विभागातर्फे राज्य पुरस्कृत उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी अंतर्गत सेंद्रिय कापूस प्रकल्प भालगाव (ता.एरंडोल) येथील मुरलीधर नामदेव मराठे यांच्या शेतात राबवलेल्या सेंद्रिय कापूस पिकाची व निंबोळी अर्क,जीवामृत दशपर्णी अर्क,बायोडायनामिक कंपोस्ट डेपो व अंडे जनित अमिनो आम्ल या प्रात्यक्षिकास भेट देऊन पाहणी केली.

यावेळी श्री वाघ यांनी आत्मा गटाच्या अध्यक्षा श्रीमती अलका पाटील यांचेसह उपस्थित शेतक-यांशी चर्चा करून मार्गदर्शन केले.तसेच सोनबर्डी येथे संदीप भटू सोनवणे यांच्या शेतात अतिघन पद्धतीने लागवड केलेल्या कापूस पिकाची पाहणी केली व सापळापिके,मित्र कीड आणि किंडीची आर्थिक नुकसान पातली,कामगंध सापळे,पक्षी,थांबे याबाबत शेतक-यांना माहिती दिली.

कासोदा येथील शेतकरी मधुकर समदाणी यांना (महाडीबीटी अंतर्गत) उपअभियान कृषी यांत्रिकीकरण योजनेत औजार बँक अंतर्गत trakctor,दोन फळी नांगर,रोटाव्हेटर,पेरणी यंत्र याची पाहणी करून तांत्रिक मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हा कृषी अधिक्षक संभाजी ठाकूर,कृषी उपसंचालक अनिल भोकरे,उपविभागीय कृषी अधिकारी दादाराव जाधवर,तालुका कृषी अधिकारी शरद बोरसे,मंडळ

कृषी अधिकारी श्रीमती प्राजक्ता,पाटील,मंडळ कृषी अधिकारी निखील टोळकर,कृषी पर्यवेक्षक किशोर साळुंखे,धनंजय सावंत,कृषी सहाय्यक विजेंद्र महाजन,चंद्रकान सैंदाणे,उमाजी मुरमुरे यांचेसह कर्मचारी व शेतकरी उपस्थित होते.

आपण या बातम्या वाचल्यात का?

टीम झुंजार