कारल्यासारखा दिसणारा कर्टुल्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. अनेकजण याला ‘काकोरा’ या नावानेही ओळखतात. पावसाळ्यात कर्टुल्याची भाजी खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होतो. त्याचे आरोग्याशी संबंधित इतर फायदे काय आहेत, चला जाणून घेऊया.
चांगल्या आरोग्यासाठी उत्तम अन्नाची शिफारस केली जाते. त्यात भाज्यांचे नाव सर्वात वर येते. भाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे शरीरातील पौष्टिकतेची कमतरता पूर्ण करून आजारांपासून दूर राहण्यास मदत करतात. कर्टुला ही भाजी ही देखील अशाच फायदेशीर भाज्यांपैकी एक आहे. ज्याच्या सेवनाने रोग तर बरे होतातच, पण रामबाण उपायासारखे कामही होते. या भाजीला कंटोला, कंटोळी किंवा कर्टुला म्हणतात. कर्टुलाला आयुर्वेदिक औषध असेही म्हणतात. कारल्यासारखा दिसणारा कर्टुल्याचे आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत. अनेकजण याला ‘काकोरा’ या नावानेही ओळखतात. पावसाळ्यात कर्टुल्याची भाजी खाल्ल्याने संसर्गाचा धोका कमी होतो. त्याचे आरोग्याशी संबंधित इतर फायदे काय आहेत, चला जाणून घेऊया

जगातील सर्वात शक्तिवर्धक तसेच औषधी भाजी आहे.
हिरव्या भाज्यांचे सेवन केल्याने अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात असे तज्ज्ञ सांगतात. परंतु हिरव्या भाज्यांमध्ये अशा अनेक भाज्या आहेत. ज्या खाल्ल्याने तुमचे शरीर निरोगी राहते. अशीच एक भाजी म्हणजे कर्टुले होय. ही जगातील सर्वात शक्तिवर्धक तसेच औषधी भाजी आहे.
वजन करते नियंत्रित :-
Netmeds.com च्या मते, जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल. तर कर्टुल्याची भाजी तुम्हाला यामध्ये चांगली मदत करू शकते. यामध्ये कॅलरी खूप कमी आणि फायबर जास्त असल्याने भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते.
रक्तदाब नियंत्रित होतो :-
कर्टुल्याची भाजी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर ठरते. कर्टुल्याच्या रसाचा आहारात समावेश केला तरी रक्तदाब नियंत्रणात राहू शकतो.
कर्करोगापासून संरक्षण :-
कर्टुल्यामध्ये ल्युटीन आढळते, ज्याच्या मदतीने हृदयाच्या समस्यांसह कर्करोगदेखील टाळता येतो. हे व्हिटॅमिन सी चा एक चांगला स्त्रोत आहे, जो शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतो. यामुळे कर्करोग होण्याचा धोका बर्याच प्रमाणात कमी होतो.
मधुमेह नियंत्रित होतो :-
कर्टुल्याच्या भाजीने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. पाण्यासोबतच यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो. कर्टुला भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. याच्या सेवनाने मुरुमे, रोगप्रतिकारशक्ती, पचनाशी संबंधित समस्यांवरही मात करता येते.
कर्टुलांमध्ये मांसापेक्षा 50 पट जास्त प्रथिने
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कर्टुल्यांमध्ये मांसापेक्षा 50 पट अधिक ताकद आणि प्रोटीन असते. कर्टुल्याच्या भाजीमध्ये असलेले फायटोकेमिकल्स आरोग्याला निरोगी ठेवण्यास खूप मदत करतात.
कर्टुले हा भाजीचा राजा
कर्टुले हा भाजीचा राजा आहे. या भाजीची चव कडू असली तरी नियमितपणे खाल्ल्यास तुम्हाला अनेक मोठे फायदे मिळतील.
हे वाचलंत का ?
- अंगारिका चतुर्थीनिमित्त श्रीक्षेत्र पद्मालय येथे पहाटे महापूजा; भाविकांची गर्दी, प्रशासनाची चोख व्यवस्था
- एरंडोल तालुक्यात हळदी समारंभात गावठी कट्ट्यासह फिरणारा युवक अटकेत; जिवंत काडतूस जप्त.
- खरीप हंगामासाठी सज्जता; एरंडोल-पारोळा आढावा बैठकीत आमदार अमोलदादा पाटील यांचे मार्गदर्शन
- एरंडोलमध्ये बुद्ध जयंती समितीची बैठक उत्साहात संपन्न, सुमित उर्फ लकी शिंदे यांची अध्यक्षपदी सर्वानुमते निवड.
- ग्रामीण भागातील विक्रेत्यांकडून एरंडोल शहरात गुटख्याची विक्री, पोलीस प्रशासनासह अन्न व औषध प्रशासनाचे सोयीस्करपणे दुर्लक्ष.






